व्हॉट्सॲप युजर्सला 'अशा' पद्धतीने मिळणार चॅटचा बॅकअप

व्हॉट्सॲप युजर्सला 'अशा' पद्धतीने मिळणार चॅटचा बॅकअप

मुंबई । Mumbai

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social media platform) आणि जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ॲप्सपैकी एक असलेले व्हाट्सॲप मेसेंजर ॲप्लिकेशन (WhatsApp) आता त्यांच्या युजर्ससाठी एक भन्नाट प्रयोग करत आहे...

व्हॉट्सॲपचा केंद्रबिंदू असलेल्या चॅटच्या बॅकअपसाठी युजर्सला नव्या फिचरचा (WhatsApp New Features) उपयोग होणार आहे. नेहमीच व्हाट्सॲप कंपनीकडून नवनवे प्रयोग करुन युजर्सला आवडतील असे फिचर्स आणले जातात. आताही एका नव्या फिचरमुळे युजर्सला व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप (chat back up) नव्या डिव्हाईसवर घेता येणार आहे. म्हणजेच युजर्सला चॅटचा बॅकअप फोन, लॅपटॉप आणि पीसीवर (laptop and PC) स्टोअर करता येणार आहे.

विशेष म्हणजे, अँड्रॉईड (Android) वापरकर्त्यांना त्यांचे चॅट बॅकअप ॲपच्या बाहेर इतर डिवाइसवर स्टोर करता येणार आहेत. त्यासाठी व्हॉट्सॲप एक नवीन प्रयोग करत आहे. व्हॉट्सॲप चॅटचा बॅकअप वापरकर्ते गुगल ड्राइव्ह (Google Drive) सह लोकल स्टोरेजमध्ये एक्सपोर्ट करु शकतील. तसेच गुगल ड्राईव्हच्या बाहेर चॅटचा बॅकअप घेण्यासाठी इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप यूजर्सना परवानगी देईल.

तसेच व्हॉट्सअ‍ॅप अँड्रॉईड युजर्सला त्यांच्या चॅटचा गुगलस ड्राईव्हवर बॅकअप घेण्यासाठी परवानगी देते. याशिवाय युजर्सला नेहमीच प्रायमरी डिव्हाईसवर (primary device) अकाउंट मध्ये लॉग इन करता येईल. त्यावेळी गुगल ड्राईव्ह मध्ये स्टोअर केलेला नवीन बॅकअपही डाउनलोड करता येणार आहे. परंतु या बॅकअपवर वापरकर्त्यांसाठी कोणतेही नियंत्रण ठेवले जात नाही.

या नवीन फिचरसह (new features) वापरकर्ते त्यांच्या लोकल स्टोरेज किंवा इतर कोणत्याही क्लाऊड स्टोरेजवर व्हॉट्सॲपचे चॅट बॅकअप संचयित करु शकते. तसेच या बॅकअपमध्ये मेसेज, फोटो,व्हिडिओ आणि इतर फाईल्ससह युजर्सचा सर्व चॅट डेटा असणार आहे. तर वापरकर्ते या चॅटचा बॅकअप डाउनलोड करून तो गुगल ड्राईव्हवर पुन्हा ठेवू शकणार आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com