Tik Tok
Tik Tok
गॅजेट

टिक - टॉक पुन्हा सुरू होणार ?

केंद्र सरकारने ५९ चीनी अ‍ॅप वर बंदी घातली आहे.

Nilesh Jadhav

दिल्ली - भारत - चीन यांच्या तणावपूर्ण वातावरणात भारताने चीनला डिजिटल स्ट्राईक करत जोरदार धक्का दिला आहे. केंद्र सरकारने ५९ चीनी अ‍ॅप वर बंदी घातली आहे. या मध्ये टिक टॉक या प्रसिद्ध अ‍ॅपचा देखील समावेश आहे.

या पार्श्वभूमीवर टिक टॉक इंडियाचे प्रमुख निखिल गांधी यांनी ट्विटरवर एक पत्रक प्रसिद्ध करत म्हटले आहे, "भारत सरकारने टिक टॉकसह ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या आदेशाचे पालन आम्ही पालन करत आहोत. भारत सरकारच्या संबंधित विभागाकडून बैठकीचे निमंत्रण आले आहे. या बैठकीत आमची बाजू मांडण्यासाठी व स्पष्टीकरण देण्यासाठी संधी मिळणार आहे. डेटा प्रायव्हसी आणि डेटा सेक्युरिटीच्या अधिनियमाचे आम्ही काटेकोर पालन करत असून कोणत्याही वापरकर्त्यांची कोणतीही माहिती चीन किंवा परदेशी सरकारला दिली नाही. तशी मागणी कोणत्याही देशाकडून करण्यात आली, तरीही आम्ही कोणत्याही परिस्थितीत देणार नाही. आमच्या दृष्टीने वापरकर्त्यांची गोपनीयता व अखंडता याला अनन्य साधारण महत्व आहे." यामुळे होणाऱ्या बैठकीकडे टिक टॉक चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com