Twitter
Twitter
गॅजेट (old)

ट्विटर वर्णद्वेषी शब्द हटवणार

ट्विटरवर आता मास्टर(master), स्लेव(slave) आणि ब्लॅकलिस्ट(blacklist) या शब्दांचा उपयोग करणार नाही.

Nilesh Jadhav

अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लायड याच्या मृत्युनंतर अमेरिकेसह युरोपियन देशात " ब्लॅक लिव्हज मॅटर"(Black Lives Matter) हे अभियान सोशल मिडियावर चालले आहे.

या अभियानाच्या पार्श्वभूीवर सोशल मीडिया साईट ट्विटरने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांच्या प्लॅटफॉर्म वरील वर्णद्वेषी शब्द हटवण्याचा निर्णय ट्विटरने घेतला आहे. ट्विटरवर आता मास्टर(master), स्लेव(slave) आणि ब्लॅकलिस्ट(blacklist) या शब्दांचा उपयोग करणार नाही.

ट्विटर इंजिनीयरर्स टीमने ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हंटले आहे, "शब्द खूप महत्वाचे असतात. आम्ही आमच्या कोडिंग पा वापरलेल्या भाषेला सकारात्मक बनवणार आहोत. त्यानुसार आता whitelist ऐवजी allowlist, master ऐवजी leader, slave ऐवजी followers आणि blacklist ऐवजी denialist या शब्दांचा उपयोग केला जाणार आहे.

या आधी देखील प्रसिद्ध भारतीय कंपनी हिंदुस्थान युनिलिव्हरने अमेरिका व युरोपातील वाढत्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे उत्पादन "फेअर अँड लव्हली" मधील फेअर हा शब्द काढून त्याऐवजी "ग्लो" हा शब्द वापरायला सुरवात केली आहे. आता त्या उत्पादनाचे नाव "ग्लो अँड लव्हली" असे करण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com