या ‘स्वस्त’ फोनला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
गॅजेट (old)

या ‘स्वस्त’ फोनला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद

फक्त दोन मिनिटांत १.५ लाखांहून जास्त विक्री : कंपनीकडून दावा

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

लडाखमधील गलवाण खोर्‍यात झालेल्या चकमकीनंतर देशभरात चीन वस्तुंवर बहिष्कार घालण्याची मोहिम सुरु झाली होती. पण याच दरम्यान भारतात काल पहिल्यांदाच रिअलमी कंपनीने रिअलमी सी११ या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनसाठी फ्लॅश सेलचे आयोजन केले होते. भारतीय ग्राहकांचा या सेलमध्येरिअलमी सी११ ला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे समोर आले आहे. दुपारी १२ वाजता ऑॅनलाइन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्ट आणि रिअलमी इंडियाच्या वेबसाइटवर सेल सुरू झाल्यानंतर १.५ लाखांहून जास्त रिअलमी सी११ फोनची अवघ्या दोन मिनिटांतच विक्री झाल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. याबाबतची माहिती रिअलमी कंपनीने टिवटरद्वारे दिली आहे.

गेल्या आठवड्यात भारतात कंपनीने रिअलमी सी११ हा नवीन बजेट स्मार्टङ्गोन लॉंच केला आहे. त्याचबरोबर गेल्या महिन्यात मलेशियामध्ये हा स्मार्टफ़ोन लॉंच करण्यात आला होता. या फ़ोनचे वैशिष्ट्य म्हणजे यात मीडियाटेक हीलियो जी३५ प्रोसेसर आणि ५०००mAh क्षमतेची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. फोटो फिचरही शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेर्‍यामध्ये दिले आहे. रिअलमी सी११ मध्ये ६.५ इंच एचडी (७२० × १६०० पिक्सल) मिनीड्रॉप डिस्प्ले आहे. प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३+ असून २.३ गीगाहर्ट्ज़ ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी ३५ प्रोसेसर देण्यात आला आहे. २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज असलेल्या या फोनला मेमरी कार्डचाही सपोर्ट आहे. अँड्रॉइड १० बेस्ड रिअलमी यूआयवर आधारित हा फोन ड्युअल-सिम कार्डला सपोर्ट करतो. या फोनच्या मागील बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप असून १३ मेगापिक्सलचा प्रायमरी तर, २ मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. कॅमेर्‍यात ब्यूटी, फिल्टर मोड, एचडीआर, पोट्रेर्ट मोड आणि टाइमलॅप्स यांसारखे अनेक फीचर्स आहेत. तसेच, फास्ट चार्जिंगच्या सपोर्टसह ५०००mAh क्षमतेची बॅटरी आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये ४जी एलटीई, वाय-फाय ८०२.११ बीजीएन, ब्लूटूथ ५.०, जीपीएसए-जीपीएस, माइक्रोर्‍यूएसबी आणि ३.५ एमएम हेडफोन जॅक यांसारखे पर्याय आहेत. २९ जुलै रोजी हा फोन पुन्हा एकदा फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असणार आहे. ७,४९९ रुपये एवढी रिअलमी सी११ या नवीन ङ्गोनची किंमत ठेवण्यात आली आहे. हा फोन रिच ग्रीन व रिच ग्रे अशा दोन कलरमध्ये उपलब्ध असेल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com