SBI ने सुरू केली खास सेवा !

ATM मधून कितीही वेळा पैसे काढले तरी नाही द्यावं लागणार शुल्क
SBI ने सुरू केली खास सेवा !

नवी दिल्ली - New Dehli

बँकेतून पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर आजही सर्वाधिक प्रमाणात होतो. मात्र अद्याप अनेक ग्राहकांना हे माहित नाही आहे की, एटीएममधून पैसे काढण्यासाठीची (ATM Transactions) संख्या मर्यादित करण्यात आली आहे. जर ग्राहकांनी निश्चित मर्यादेपेक्षा अधिक वेळा पैसे काढले तर त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावे लागते. स्टेट बँक ऑॅफ इंडियाने त्यांच्या ग्राहकांना या शुल्कापासून वाचण्यासाठी एक पर्याय सूचवला आहे. स्टेट बँक ऑॅफ इंडियाचे ग्राहक (SBI) एटीएममधून कार्ड न वापरता योनो (धजछज) सुविधेच्या माध्यमातून देखील पैसे काढू शकतात. याकरता एटीएम व्यवहाराचे कोणतेही शुल्क त्यांना द्यावे लागणार नाही.

योनो ॲपमधून कसे काढाल पैसे?

योनो ॲपमधून पैसे काढण्यासाठी सर्वात आधी तुमच्या फोनमध्ये योनो ॲप डाऊनलोड करून घ्या.

-किंवा तुम्ही https://www.sbiyono.sbi/ याठिकाणी जाऊनही लॉग इन करू शकता.

-त्यानंतर नेटबँकिंग युजर आयडी आणि पासवर्ड टाकावा लागेल. ॲक्टिव्ह युजर आयडी आणि पासवर्ड टाकल्यानंतर पुन्हा एकदा लॉग इनवर लिक करा.

र्‍यानंतर तुम्हाला एसबीआय योनो डॅशबोर्ड दिसेल, याठिकाणी तुम्हाला तुमच्या खात्याची सर्व माहिती मिळेल. आता कार्डशिवाय पैसे काढण्यासाठी खाली असणार्‍या ’माय रिवॉर्ड’ सेक्शनमध्ये स्क्रोल करा. याठिकाणी YONO Pay, YONO Cash, Bill Pay, Products, Shop, Book & Order यांसारखे पर्याय दिसतील.

- या पर्यायांपैकी YONO Cash वर लिक करा.

- याठिकाणी तुम्हाला रोजच्या व्यवहारांची माहिती मिळेल. तुम्ही एका ट्रान्झाक्शनमध्ये 500 ते 10000 रुपयांची रक्कम काढू शकता. योनो वेबसाइटच्या माध्यमातून एसबीआय एटीएममधून तुम्ही जास्तीत जास्त 20000 हजार रुपये काढू शकता.

-रिक्वेस्ट योनो कॅशवर क्लिक केल्यानंतर तुमच्या बचत खात्यातील शिल्लक रक्कम तुम्हाला दिसेल. त्याखाली असणार्‍या टॅबमध्ये तुम्हाला एटीएममधून जी रक्कम काढायची आहे ती टाका त्यानंतर NEXT' Jej क्लिक करा.

-त्यानंतर 6 अंकांचा योनो कॅश पिन टाकावा लागेल आणि योनो वेबसाइटच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.

-कार्ड न वापरता तसंच किंवा योनो App शिवाय देखील हा व्यवहार करता येईल. या व्यवहारासाठी 6 अंकांचा योनो कॅश पिन टाकावा लागेल आणि योनो वेबसाइटच्या माध्यमातून पैसे काढण्याची प्रक्रिया सुरू करता येईल.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com