गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले ११ धोकादायक ॲप

गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले ११ धोकादायक ॲप

मुंबई -

हॅकर्स स्मार्टफोनच्या माध्यमातून लोकांची फसवणूक करतात. त्याचबरोबर असे अनेक गुगलच्या प्ले स्टोअरवर ॲप आहेत, ज्यांच्या माध्यमातून युझर्सचा स्मार्टफोन सहज हॅक करता येतो. दरम्यान असे संशयित ॲप गुगल प्रत्येकवेळी आपल्या प्ले स्टोअरमधून हटवते आणि त्यावर बंदी घालते.

असेच ११ धोकादायक अॅप गुगलने प्ले स्टोअरमधून हटवले आहेत. थेट युझर्सच्या बँक खाते हे अँड्रॉईड ॲप हॅक करु शकतात. ज्या माध्यमातून कधी-कधी क्रेडिट-डेबिट कार्डमधून पैसेही कट होऊ शकतात आणि युझर्सला समजतही नाही. तसेच यामधून युझर्सच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनमधून प्रीमिअम सर्व्हिससाठी सब्सक्राईब केले जाते. गुगलकडून हे ॲप हटवण्यात आले आहे. जर तुम्ही हे ॲप वापरत असाल तर कृपया डिलिट करा.

Cheery Message (दोन वेगवेगळे अॅप)

Relaxation Message

Memory Game

Loving Message

Friend SMS

Contact Message

Compress Image

App Locker

Recover File

Remind Alarm – Alarm & Timer & Stopwatch App

या अॅपवर २०१७ पासून गुगलचे लक्ष होते. जोकर मालवेअरपासून हे सर्व अॅप इन्फेक्टेड आहेत. गुगलने या अॅपला २०१७ ला ट्रॅक केले होते. अनेक वर्षांपासून गुगलच्या प्ले स्टोअर प्रोटेक्शनच्या नजरेतून हे सर्व ऍप स्वत: चा बचाव करत आहेत. हे अॅप युझर्सने किमान पाच लाख वेळा डाऊनलोड केले आहेत. आता हे अॅप डिलिट करण्यास युझर्सलाही सांगण्यात आले आहे. गुगलने या वर्षाच्या सुरुवातीला १७०० अॅपला गुगल प्ले स्टोअरमधून हटवले होते. हे सर्व अॅप जोकर मालवेअरला इन्फेक्टेड होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com