मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा
गॅजेट (old)

मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा

बंद करणार जगभरातील रिटेल स्टोर्स

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली -

दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी मायक्रोसॉफ्टने आपले जगभरातील रिटेल स्टोर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मायक्रोसॉफ्टने सांगितले की, सर्व रिटेल स्टोर्स बंद केले जाणार असून, केवळ ४ स्टोर्स सुरु राहतील. या चार स्टोर्समध्ये देखील उत्पादनांची विक्री केली जाणार नाही. हे ४ स्टोर्स एक्सपेरियंस स्टोर्स म्हणून सुरू राहतील. कंपनी आता डिजिटल स्टोर्सवर लक्ष देणार आहे.

कंपनीने सांगितले की, मायक्रोसॉफ्ट.कॉम, एक्सबॉक्स आणि व्हिंडोजी महिन्याला सक्रिय युजर्सची संख्या १.२ बिलियन आहे. ही संख्या १९० बाजारांमधील आहे. सध्या कोणत्याही प्रकारची कामगार कपात करत नसल्याचे देखील कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने हे स्टोर्स कधीपासून बंद होतील हे स्पष्ट केलेले नाही. मात्र ग्राहकांना रिटेल स्टोर्समध्ये मिळणार्‍या सर्व सेवा ऑॅनलाईन मिळतील, असे सांगितले आहे.

मायक्रोसॉफ्टनुसार, ऑॅनलाईन विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आमची टीम ग्राहकांना रिटेल स्टोर्सच्या तुलनेत व्हर्च्युअल अधिक उत्तम सेवा देत आहे. आम्ही जगभरातील कोणत्याही कोपर्‍यातून काम करू शकणार्‍या मल्टीटॅलेंटड लोकांची टीम तयार केली आहे. या टीममध्ये १२० पेक्षा अधिक भाषा समजणारे लोक आहे.

मार्च महिन्यात कोरोना व्हायरसमुळे कंपनीने आपले स्टोर्स बंद केले होते. या काळात मायक्रोसॉफ्टच्या टीमने व्यापारी आणि ग्राहकांना ऑॅनलाईन मदत केली होती. टीमने हजारो वर्कशॉपचे आयोजन केले होते.

Deshdoot
www.deshdoot.com