Samsung चा बहुचर्चित Galaxy M31s भारतात लॉन्च, पहा त्याचे वैशिष्टे

फोनचा पहिला सेल 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉनवर
Samsung चा बहुचर्चित Galaxy M31s भारतात लॉन्च, पहा त्याचे वैशिष्टे

दिल्ली | Delhi

भारतातील प्रसिद्ध मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगने आज आपल्या प्रसिद्ध गॅलेक्सी एम सीरीजचा एक नवीन स्मार्टफोन Galaxy M31s भारतात लॉन्च केला आहे. हा फोन काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेल्या सॅमसंग गॅलेक्सी एम 31 ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे.

सॅमसगच्या एम सीरिजच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी डिस्प्ले, याशिवाय यात सॅमसंगचा एक्सीनोस 9611 प्रोसेसर आहे ज्याची क्लॉक स्पीड 2.3 गीगाहर्ट, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी पर्यंत स्टोरेज उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. 20,000 रुपयांच्या रेंजमध्ये मोठा डिस्प्ले आणि 6000 एमएएच बॅटरी, देण्यात आली आहे. फोनचा पहिला सेल 6 आणि 7 ऑगस्ट रोजी अ‍ॅमेझॉनवर होणार आहे.

फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटरनल स्टोरेजसोबत येईल. या फोनचा एक 6 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटरनल स्टोरेजचा व्हेरियंट सुद्धा कंपनी लाँच करू शकते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com