व्हॉट्सॅपवर मिळणार कर्ज
गॅजेट

व्हॉट्सॅपवर मिळणार कर्ज

विमा आणि पेंशन सेवा : कंपनीची अनेक भारतीय बँकांसह भागीदारी

Ramsing Pardeshi

मुंबई - Mumbai

इंस्टंट मेसेजिंग ॲप व्हॉट्सॅपवर (Instant messaging app WhatsApp) आता भारतात नागरिकांना कर्ज (loan) देणार आहे. कंपनीने यासाठी अनेक भारतीय बँकांसह भागीदारी केली आहे. याशिवाय कमी उत्पन्न असणार्‍या कर्मचार्‍यांसाठी देखील आता व्हॉटसअॅप विमा आणि पेंशनची व्यवस्था करणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या व्हॉट्सॅपने या सेवेसाठी आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेसोबत भागीदारी केली आहे. सध्या व्हॉट्सॅपच्या या सेवेंतर्गत ग्रामीण भागात विमा आणि पेंशन देणार असल्याचे सांगितले जात आहे.

व्हॉट्सॅपवर इंडियाचे प्रमुख अभिजीत बोस (Abhijeet Bose) यांनी सांगितले की, कंपनी येणार्‍या वर्षात आणखी बँकांसोबत भागीदारी करणार आहे व कमी उत्पन्न असणारे व ग्रामीण भागातील लोकांसाठी बँकिंग सेवा सोपी करण्याचा प्रयत्न आहे.

बँकेसोबत भागीदारी अंतर्गत ग्राहक बँकेला ऑटोमेटेड टेक्स्टद्वारे संवाद साधू शकतील. यासाठी बँकेत व्हॉट्सॅपवर नंबर रजिस्टर करावा लागेल. यानंतर ग्राहकांना खात्यातील रक्कमेपासून ते खात्यासंबंधी इतर माहिती व्हॉट्सॅपवरच मिळेल. व्हॉट्सॅप इंडियाच्या प्रमुखांनी म्हटले की, येत्या दोन वर्षांत बँकांसोबत मिळून कमी उत्पन्न असलेल्या कामगारांसाठी विमा, मायक्रो क्रेडिट आणि पेन्शनसारख्या सुविधा सुलभ करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. कंपनी लवकरच पायलट प्रकल्प सुरू करण्याची तयारी करत आहे. मात्र अद्याप सरकारकडून याला परवानगी मिळालेली नाही.

Deshdoot
www.deshdoot.com