<p>नवी दिल्ली - New Delhi</p><p>व्हिडिओ मेकिंग अॅप TikTok वर भारतात बंदी आहे. सरकारने या चिनी अॅपवर बंदी घातल्यानंतर आता नागरीकांना फसवण्यासाठी मेसेज...</p>.<p>येण्याचे वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. टिकटॉक डाऊनलोड करण्यासाठी एक संशयास्पद SMS येत आहेत. ज्यामध्ये टिकटॉक भारतात पुन्हा सुरू झालं आहे असं लिहिण्यात आलं आहे. या मेसेजमध्ये TikTok Pro नावाच्या apk फाइलची लिंक देण्यात आली आहे. त्यामुळे हा अॅप वापरण्यासाठी लोक ही लिंक फोनमध्ये डाउनलोड करतात. पण असं केल्याने तुमच्या फोनमधील डेटा आणि वैयक्तिक डेटा चोरला जाऊ शकतो.</p><p>'TikTok भारतात परत आला आहे. नवीन वैशिष्ट्यांसह आता क्रिएटिव्ह व्हिडिओ तुम्ही पुन्हा तयार करू शकता. त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवरून TikTok v1 डाउनलोड करा. या मेसेजला एक लिंक जोडली आहे. जी एकApk फाइल आहे. या लिंकवर क्लिक केल्याने Apk अॅपचं स्टोअर उघडलं जातं, तिथून लोक खोटं टिकटॉक खरं समजून डाऊनलोड करत आहेत अशा प्रकारापासून सावध रहावे.</p>