गॅजेट

चायनीज फोनसाठी धोक्याची घंटा

जिओ आणि गूगलची भागीदारी संपवू शकते भारतीय बाजार पेठेतील चिनी स्मार्टफोनचे वर्चस्व

Ramsing Pardeshi

नवी दिल्ली - New Delhi

भारताच्या स्मार्टफोन बाजारात चीनी कंपन्यांचे वर्चस्व आहे. पण आता रिलायंस इंडस्ट्रीजचा जिओ प्लॅटफार्म आणि अमेरिकन टेक कंपनी गूगलच्या भागीदारीनंतर भारतीय बाजारातील चीनी स्मार्टफोनचे वर्चस्व कमी होऊ शकते. गूगलने मागच्या आठवड्यात जिओमध्ये ४.५ अब्ज डॉलर (जवळपास ३३,६०० कोटी रुपये)च्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे.

या गुंतवणुकीतील काही पैशांचा उपयोग जिओ सर्वात स्वस्त स्मार्टफोन तयार करण्यासाठी करणार आहे. या बळावर जिओ आणि गूगल देशातील त्या लोकांपर्यंत पोहचू शकतात, ज्यांनी आतापर्यंत स्मार्टङ्गोनचा वापर केलेला नाही. देशात आतापर्यंत ५० कोटींपेक्षा जास्त लोक स्मार्टफोन वापरत नाहीत.

१७ टक्के बाजार सॅमसंगकडे

रिसर्च फर्म कॅनालिसनुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारतात विक्री झालेल्या स्मार्टफोनमध्ये चीनी कंपन्यांचे योगदान ७५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे. दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगची बाजारात १७ टक्के भागीदारी आहे. आयडीसीच्या सीनियर रिसर्च मॅनेजर किरणजीत कौर म्हणाल्या की, जिओ आणि गूगलच्या स्वस्त स्मार्टफोनमुळे चीनी कंपन्यांना धोक्याची घंटा आहे.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com