Friday, May 10, 2024
HomeUncategorizedदाट धुक्यात न्हाऊन निघाला मोखाडा परिसर

दाट धुक्यात न्हाऊन निघाला मोखाडा परिसर

नाशिक | प्रतिनिधी

नाशिक शहरापासून ५० किमी अंतरावर असलेल्या मोखाडा तालुक्यात हिरवाईचे कोंदण आहे. एकीकडे पावसाची संततधार तर दुसरीकडे भल्या सकाळी याठिकाणचा परिसर धुक्यात दाटून जातो. यामुळे याठिकाणचे विलक्षण छायाचित्रे लक्ष वेधल्याशिवाय राहत नाहीत.

- Advertisement -

मोखाडा तालुक्यात ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण आहे. मध्य वैतरणा धरणदेखील याच तालुक्यात आहे. येथील खोडाळा नजीक ३ कि.मी.अंतरावर असलेले निसर्ग रम्य सिध्दीविनायक मंदिरातही भाविकांची पर्यटनाच्या निमित्ताने गर्दी होते.

येथील पळसपाडा डॅम परिसरातदेखील हौशी पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेतात. मोखाडा तालुक्यात सह्याद्रिच्या पुर्व उताऱ्यावर तांबडी गाळाची माती आढळते. तसेच मोखाडा तालुक्यातील जमीनही डोंगराळउतारावर आढळणारी वरकस जमीन म्हणून ओळखली जाते.

हा भाग पालघर जिल्ह्यात मोडतो. याठिकाणचा किल्ला देखील प्रसिद्ध असून याठिकाणी पर्यटकांची मांदियाळी नियमित बघायला मिळते.

आमच्या मोखाडा येथील वार्ताहर मधुश्री आहेर यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केलेले काही आकर्षक छायाचित्रे.

- Advertisment -

ताज्या बातम्या