Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedभारतात अशी झाली पहिली निवडणूक, निवडणुकीसाठी लागले ५ महिने

भारतात अशी झाली पहिली निवडणूक, निवडणुकीसाठी लागले ५ महिने

सध्या बिहारमधील निवडणुकाचा प्रचाराचा जोर वाढला आहे. देशातील निवडणुकीचा इतिहास रंजक आहे. देशातील पहिल्या निवडणूक प्रक्रियेस आजच्या दिवशी म्हणजेच 25 ऑक्टोबर 1951 ला सुरुवात झाली होती. 21 फेब्रुवारी 1951 रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपला.

तब्बल 68 टप्प्यांमध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली. याचा अर्थ देशाच्या वेगवेगळ्या भागात 68 दिवस मतदान झाले होते. हिमाचल प्रदेश मध्ये पहिल्या टप्प्याचे मतदान झाले. पहिल्यांदा मतदान करण्याचा मान तेथील चिनी आणि पांगी या मतदारसंघाला मिळाला. देशातील शेवटच्या टप्प्याचे मतदान सगळ्यात मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात पार पडले.

- Advertisement -

देशातील 54 राजकीय पक्ष त्या निवडणुकीत एकूण सहभागी झाले होते. देशभरात 1 हजार 874 उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. त्या काळात ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट अर्थातच नव्हते. बॅलेट पेपरचा वापर 1951-52साली करण्यात आला होता. मतपत्रिका व मतपेटीत टाकण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर वेगवेगळे बॉक्स ठेवण्य़ात आले होते. मतदाराला कोणत्याही बॉक्समध्ये मत टाकण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते.

1951 साली आतासारखे सोशल मीडिया, टीव्ही किंवा जाहिरातींचा सुळसुळाटही नव्हता. ईव्हीएमसारखे तंत्रज्ञानही त्याकाळात नसल्यामुळे प्रचारसभा, वृत्तपत्र, फलक, पत्रक, आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन प्रचार होत असे.

पहिल्या निवडणुकीत काँग्रेसने 364 जागा जिंकून बहुमत प्राप्त केले. भारतीय कम्युनिस्ट पार्टी 16 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आली. आर्चाय नरेंद्र देव, जयप्रकाश आणि डॉ. लोहिया यांच्या नेतृत्वाखालील सोशालिस्ट पार्टीने 12, आचार्य कृपलानी यांच्या नेतृत्वाखालील किसान मजदूर प्रजा पार्टीला 9, हिंदू महासभेला 4, डॉ. शमाप्रसाद मुखर्जी यंच्या नेतृत्वाखालील भारतीय जनसंघाला 3, रिवोलूशनरी सोशालिस्ट पार्टीला 3 आणि शेडय़ूल कास्ट फेडरेशनला 2 जागा मिळाल्या.

काँग्रेस पक्षाने एकूण 4 कोटी 76 लाख 65 हजार 951 म्हणजे 44.99 टक्के मते मिळवली. त्याकाळी एका मतदारसंघात एकापेक्षा अधिक जागा असत. त्यामुळे 489 जागांसाठी 401 मतदारसंघात निवडणुका झाल्या. 1960 पासून ही व्यवस्था बदलण्यात आली. एक जागा असलेले 314 मतदारसंघ होते. 86 मतदारसंघात दोन जागा आणि एका मतदारसंघात तीन जागा होत्या. दोन सदस्य अँग्लो भारतीय समुदातून निवडले गेले.

आंबेडकरांचा पराभव

राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी काँग्रेस पक्षाशी फारकत घेऊन आपला शेल्ड्यूल्ड कास्ट फेडरेशन पक्ष स्थापन केला. त्याची झळ त्यांना या पहिल्याच निवडणुकीत बसली. नारायण काजरोळकर या काँग्रेसच्या उमेदवाराकडून आंबेडकरांना पराभव पत्करावा लागला. काँग्रेस पक्षाने गद्दारी केली, अशी प्रखर टीकादेखील या पराभवामुळे काँग्रेस पक्षाला त्या वेळी सहन करावी लागली. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत जे १५ राजकीय पक्ष अस्तित्वात होतेत्यापैकी शिरोमणी अकाली दल आणि शेतकरी कामकरी पक्ष यांनीच आपले अस्तित्व आजपर्यंत कायम ठेवले आहे. गणतंत्र परिषद नावाच्या पक्षाने आसामगणतंत्र परिषद असे नाव धारण केले असून तो अस्तित्वात असलेला तिसरा पक्ष आहे.

निवडणुकीनंतर १७ एप्रिल १९५२ रोजी गठित केली गेली. लोकसभेने आपला ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आणि १९५७ साली ती विसर्जित केली गेली

- Advertisment -

ताज्या बातम्या