Photo Gallery : चित्रकला स्पर्धेतून ऊर्जा बचतीचा संदेश

Photo Gallery : चित्रकला स्पर्धेतून ऊर्जा बचतीचा संदेश

नाशिक | प्रतिनिधी Nashik

देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्षानिमित्त "सक्षम" या राष्ट्रीय ऊर्जा बचत मोहीम सप्ताह अंतर्गत नुकतीच बालचित्रकला स्पर्धा वाय. डी. बिटको गर्ल्स व हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, नाशिक येथे ७ वी ते ९ वी, या विविध तीन गटांमध्ये घेण्यात आली....

भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, भारत सरकार व वैशंपायन गॅस सर्विस, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पार पडली. यावेळी स्पर्धकांनी ऊर्जा बचत या विषयावरील विविध पैलू आपल्या रंग कुंचल्यातून अत्यंत कल्पकतेने मांडले.

त्यात पारंपारिक ऊर्जा स्रोत, इंधन बचत व नैसर्गिक ऊर्जा स्त्रोत अंतर्गत सौर ऊर्जा, पवन चक्की, गोबरगॅस प्रणाली त्याचा सुयोग्य वापर, प्रचार व प्रसार तसेच ऊर्जेचा अपव्यय रोखणे, ऊर्जा बचत हीच उर्जा निर्मिती यासारखे अनेक संदेश देणारे चित्रे यावेळेस विद्यार्थीनींनी रेखाटले.

स्पर्धेचे उद्घाटन डी. डी. बिटको बॉईज हायस्कूलचे चेअरमन रोहित प्र. वैशंपायन यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित स्पर्धकांना त्यांनी स्पर्धा यशस्वितेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या व ऊर्जा बचतीचे महत्त्व विशद केले.

मुख्याध्यापिका मेधा गायधनी यांनी प्रास्ताविक केले. तसेच स्पर्धा यशस्वी होण्यासाठी कलाध्यापक व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार राजेश भि. सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिवाय ऊर्जा बचतीचा मंत्र व महत्त्व विद्यार्थिनी पासून त्यांच्या परिवारात पर्यंत घरोघरी पोहोचावा यासाठी ऊर्जा बचतीचे "शपथ" कलाध्यापक राजेश सावंत यांनी विद्यार्थिनींना या स्पर्धेच्या वेळी दिली. दि एन. इ. आय. संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन सह भारत गॅस नाशिकचे प्रादेशिक प्रबंधक मौलिक कपाडिया विक्री अधिकारी प्रणाली मेश्राम, प्रशांत सूर्यवंशी, मुकुंद तांदळे यांचे स्पर्धेसाठी प्रेरणा व मार्गदर्शन लाभले.

ग. कौ. सदस्य अमिता भट, के. डी. बागुल, मीनाक्षी दौंड, भारती चंद्रात्रे, पर्यवेक्षिका सुनीता बाजपेयी, सुनंदा वाघ आदींचे सहकार्य लाभले. आभार प्रदर्शन उपमुख्यध्यापिका जयश्री पेंढारकर यांनी केले. तिन्ही गटातील विद्यार्थिनींना प्रथम, द्वितीय व उत्तेजनार्थ असे एकूण ९ पारितोषिके देण्यात येणार आहेत.

Related Stories

No stories found.