Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedDussehra 2020 : दसऱ्याला देशात 'या' ठिकाणी करतात रावणाची पूजा

Dussehra 2020 : दसऱ्याला देशात ‘या’ ठिकाणी करतात रावणाची पूजा

आज दसरा. दसऱ्याला रावणाचे दहन केले जाते, तर प्रभू श्रीरामांची पूजा केली जाते.दरम्यान भारतात अशी काही ठिकाणे आहे, जिथे रावणाचे पुतळे न जाळता त्याची पूजा केली जाते.तर जाणून घेऊया या ठिकाणांबद्दल..

मंदसौर, मध्यप्रदेश

- Advertisement -

ही रावणाची सासरवाडी आहे. त्यामुळे,इथे त्याच्या पुतळ्याचे दहन न करता जावयाची पूजा केली जाते.

जोधपुर, राजस्थान

येथे रावणाचे मंदिर आहे. एका समाजातील लोक स्वतःला रावणाचे वंशज मानतात. तसेच ते दसऱ्याला रावणाची पूजा पण करतात.

काकिनाड, आंध्रप्रदेश

येथे रावणाचे मंदिर आहे.येथील लोक रावणाला रामापेक्षा शक्तिशाली मानतात.तसेच दसऱ्याला रावणासोबत शंकराची पूजा पण केली जाते.

गडचिरोली,महाराष्ट्र

येथील लोक रावण आणि त्याच्या पुत्राला आपले पुत्र मानतात. त्यामुळे काही भागात रावणाची पूजा केली जाते.

उज्जैन, मध्य प्रदेश

उज्जैन जवळ चिखली या गावात रावणाची मोठी मूर्ती आहे. रावणाची पूजा न केल्यास गावाची जळून राख होईल,असे येथील लोक मानतात. त्यामुळे,येथे रावणाची पूजा केली जाते.

कोलार,कर्नाटक

येथे दसऱ्याला रावणाची पूजा केली जाते. रावणाला हे लोक महान शिवभक्त मानतात. त्यामुळे त्याची पूजा इथे केली जाते.

- Advertisment -

ताज्या बातम्या