दिनेश कार्तिक झाला ‘बाप’माणूस, बनला जुळ्या मुलांचा बाबा

jalgaon-digital
1 Min Read

भारतीय क्रिकेट संघाचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक काल बाप माणूस झाला आहे. त्याची पत्नी दीपिका पल्लिकलनं काल जुळ्या मुलांना जन्म दिला.

दिनेश कार्तिकनं सोशल मीडियावरुन याबाबत माहिती दिली. सोबतच आपली पत्नी आणि मुलांसोबतचा फोटो देखील त्यानं शेअर केला आहे. दिनेश कार्तिकची पत्नी दीपिका स्क्वॅश प्लेअर आहे.

कार्तिकनं आपल्या दोन्ही मुलांची नावं देखील जाहीर केली आहेत. कार्तिकनं एका मुलाचं नाव कबीर पल्लिकल कार्तिक आणि दुसऱ्या मुलाचं नाव जियान पल्लिकल कार्तिक असं ठेवलं आहे.दिनेश फोटो पोस्ट करताना दोन्ही मुलांचे चेहरे दिसणार नाहीत याची काळजी घेतली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *