Photo विविध प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ

Photo विविध प्रकारच्या राख्यांनी सजली बाजारपेठ

नागपंचमीनंतर शहराला राखीपौर्णिमेचे वेध लागले. अर्थातच बाजारपेठेत विविधरंगी आणि बहुढंगी राख्या दाखल झाल्या आहेत. अवघ्या तीन दिवसांवर राखी पौर्णिमा येवून ठेपली आहे. त्यामुळे सध्या बहिणी भावांसाठी राखी खरेदी करताना दिसून येत आहेत. यंदा काही नव्या प्रकारच्या राख्या आल्या असून त्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र यंदा किंमतीदेखील दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत.

वर्षभर सर्वच भाऊ-बहीण या सणाची आतुरतेने वाट पाहतात. हिंदू संस्कृतीनुसार, श्रावणातील नारळी पौर्णिमेला रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते, त्यासोबतच बहिणीच्या रक्षणाचे वचन भाऊ देतो. यंदा रक्षाबंधनाला पांढरे मोती, फॅन्सी जरी आणि जरदोजी राख्यांचीही खूप मागणी आहे. या राख्या दिसायला अत्यंत साध्या आणि सुंदर असतात. घुंघरू, लाख, राजस्थानी मिरर वर्क आणि काचेची सजावट असलेल्या राख्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. यामध्ये कलर्ड स्टोन, कुंदन वर्क, कलर्ड बीड्सचाही वापर करण्यात आला आहे. सोबतच यंदा काही विशेष राख्या बाजारात पाहायला मिळत आहेत. या राख्यांवर संदेश किंवा नावं, भाऊ असं सगळं लिहिलेलं असते. लहान मुलांसाठी कार्टुन राखी, बॅटरीवर चकाकणारे लाईट लावलेल्या डिजिटल राख्या आल्या आहेत. त्यांची किंमत पन्नास रुपयांपासून ते दोनशे रुपयांच्या घरात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com