PhotoGallery : जेष्ठ अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन

कॉलेजमध्ये काम करणारा माळी ते मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता
PhotoGallery : जेष्ठ अभिनेते निळू फुले यांचा आज स्मृतिदिन

नाशिक । Nashik

अकरा वर्ष कॉलेजमध्ये काम करणारा माळी ते मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता असा थक्क करणारा प्रवास करणारे महाराष्ट्राचे सिने जगतातील लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे निळू फुले (Famous actor Nilu Phule).

 • निळू फुले हयात नसले तरी आजही त्यांचे स्थान रसिकप्रेक्षकांच्या ह्दयात कायम आहे.

  निळू फुले हयात नसले तरी आजही त्यांचे स्थान रसिकप्रेक्षकांच्या ह्दयात कायम आहे.

 • आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला.

  आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः 'येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला.

 • 'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

  'एक गाव बारा भानगडी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

 • मराठी चित्रपटात निळू फुले यांनी साकारलेला ‘खलनायक’ व त्यांचे ‘बाई वाडय़ावर या’ हे वाक्य गाजले.

  मराठी चित्रपटात निळू फुले यांनी साकारलेला ‘खलनायक’ व त्यांचे ‘बाई वाडय़ावर या’ हे वाक्य गाजले.

 • 'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.

  'कथा अकलेच्या कांद्याची' या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.

 • सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

  सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत.

निळू फुले हयात नसले तरी आजही त्यांचे स्थान रसिकप्रेक्षकांच्या ह्दयात कायम आहे. अष्टपैलू अभिनेते अशी त्यांची ओळख होती. नायक आणि खलनायकी (Hero and villain roles) अशा दोन्ही प्रकारच्या भूमिका निळू फुले यांनी केल्या. मात्र त्यांनी रंगवलेला खलनायक आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. सोशल मिडियाच्या (Social Media) जमान्यातही प्रेक्षक त्यांचे संवाद विसरलेले नाहीत. मराठी चित्रपटात निळू फुले यांनी साकारलेला ‘खलनायक’ व त्यांचे ‘बाई वाडय़ावर या’ 9Bai Wadyavar Ya) हे वाक्य गाजले. चित्रपटात धोतर, पायात कोल्हापूरी चपला व डोक्यावर गांधी टोपी अशा वेशातील निळू फुल्यांची एंट्री झाली की प्रेक्षक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत.

निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे (Pune) येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी (vegetables Seller) विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण (10th STD) घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः येरा गबाळ्याचे काम नोहे' हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे (P L deshspande) यांच्या नाटकात 'रोंगे'ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र 'कथा अकलेच्या कांद्याची' (Katha Aklechya Kandyachi) या वगनाट्यातील (Vagnatya) भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खर्‍या अर्थाने पुढे आले.

'एक गाव बारा भानगडी' (Ek gaon Bara Bhangadi Movie) या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी 'चोरीचा मामला', 'पुढचं पाऊल', 'शापित', 'सामना' (Samana), 'सिंहासन' (Sihasan) यांतील भूमिका विशेष गाजल्या.

नाट्यरसिक आणि सिनेप्रेमींना कलाकार म्हणून प्रिय असलेल्या निळूभाऊंनी सेवादलाचा (Sewadal) कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केली. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठीही (Superstition Elimination Committee) काम केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com