Photo श्रीरामांच्या पालखी सोहळ्याने घडले संस्कृतीचे दर्शन

Photo श्रीरामांच्या पालखी सोहळ्याने घडले संस्कृतीचे दर्शन

नशिराबाद, ता.जळगाव - nashirabad

सर्वप्रथम (Vitthal Temple) विठ्ठल मंदिरा जवळ प्रभू (Shriram) श्रीरामचंद्र यांच्या (Palkhi) पालखीचे पूजन गावातील जेष्ठ व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नशिराबाद शिक्षण मंडळ संस्थेचे कार्याध्यक्ष योगेश पाटील (Yogesh Patil), अध्यक्ष जनार्दन माळी (Janardhan Mali), उपाध्यक्ष डॉ.विकास चौधरी, संचालक राजूदादा पाटील व विनायक वाणी, मुख्याध्यापक सी.बी.अहिरे, प्रविण महाजन, सर्व शिक्षक व गावातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर ‘मी मराठी...’ या नृत्यावर इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

यानंतर ‘मी मराठी...’ या नृत्यावर इयत्ता चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांनी नृत्य सादर करून मराठी नव वर्षाचे जल्लोषात स्वागत केले व पालखी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.

या सोहळ्यात प्रभू श्रीरामचंद्र, सितामाता, लक्ष्मण, हनुमान, शिवाजी महाराज, जिजामाता, झाशीची राणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत सावता महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले व अहिल्याबाई होळकर यांचा सजीव आरास देखावा करण्यात आलेला होता.

या कार्यक्रमात विठ्ठल मंदिर ते राम मंदिर पर्यंत वनवासी अवतरातील राम, सीता व लक्ष्मण यांची वेशभूषा दाखविण्यात आली व राम मंदिरात श्री रामाचे अयोध्येत आगमन दाखविण्यात येऊन तिथे प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला व तेथून पुढे विठ्ठल मंदिरापर्यंत श्री रामाचे राज अवतारातील रूप दाखविण्यात आले.

या मिवणुकीत ढोल, ताशे, लेझीम, काठी फिरवणे, समूह नृत्य यांचे आयोजन करण्यात आलेले होते तसेच सर्व विद्यार्थांनी मराठी वेशभूषा परिधान केलेली होती. या कार्यक्रमात पालकांनी सुद्धा घरासमोर रांगोळी काढून दिंडीचे पूजन करून स्वागत केले. या कार्यक्रमाचे नियोजन अनिल चौधरी, संगिता जोशी व शिल्पा धर्माधिकारी यांनी केले तर त्यांना सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com