Photo अनलॉकनंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची गरज
Photo अनलॉकनंतर बाजारपेठेत उसळली गर्दी

धुळे । प्रतिनिधी Dhule

शहरासह जिल्ह्या अनलॉक करण्यात आला आहे. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी बाजापेठेत चांगलीच गर्दी उसळली आहे. रस्त्यावर देखील मोठी वर्दळ आहे. मात्र दुसरीकडे तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता स्वयंशिस्त पाळणे गरजेचे आहे.

सोशल डिस्टंन्स पाळण्यासह मास्क लावणे अशा नियमांचे पालन होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे 15 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू होता. आता जिल्ह्यात रुग्णसंख्या घटल्याने आज दि.7 पासून अनलॉक करण्यात आले आहे. जिल्ह्यात सर्व प्रकारचे व्यवहार हे सकाळी सात ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा आहे. तर प्रवासी वाहतूक सुरू झाली असून बसस्थानकात देखील प्रवाशांची वर्दळ दिसून आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com