Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedPhoto : थंडीची चाहूल लागताच जॉगिंग ट्रॅकवर व्यायामप्रेमी परतले

Photo : थंडीची चाहूल लागताच जॉगिंग ट्रॅकवर व्यायामप्रेमी परतले

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात गेल्या दोन दिवसांपासून तपमानात घट (Temperature down in nashik) होत आहे. थंडीला सुरुवात झाल्याने लागल्याने जॉगिंग ट्रॅकवर (Jogging track) गर्दी वाढू लागली आहे…

- Advertisement -

सकाळी तसेच सायंकाळीदेखील नागरिक वॉक करताना दिसून येत आहेत. याशिवाय शहरातील बहुतांश जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटरमध्ये युवक गर्दी करत आहेत.

हिवाळा (Winter) ऋतू आला की शरीरस्वास्थ्याकडे लक्ष देण्यास सुरुवात होते. मजबूत, पीळदार आणि आकर्षक देहयष्टी ठेवण्यासाठी युवक-युवती जिमकडे तर काही नागरिक जॉगिंग ट्रॅककडे वळतात. त्यामुळे सध्या शहरात भल्या पहाटे,

सकाळी आणि सायंकाळीदेखील व्यायामासाठी (Exercise) जिम, जॉगिंग ट्रॅक, मॉर्निंग वॉकसाठी गर्दी वाढत आहे. हिवाळ्यात जॉगिंग करणे उन्हाळा (Summer) ऋतूच्या तुलनेत जास्त प्रभावी ठरते.

हिवाळ्यात व्यायाम केल्याने शरीर अधिक उष्णता निर्माण करते. हिवाळ्यात व्यायाम करणे हानिकारक ठरत नाही. शरीरातील फॅट कमी करण्यासाठी हिवाळा हा सर्वात अनुकूल ऋतू असल्याचे तज्ञ सांगतात.

शहरात असलेल्या सर्व जॉगिंग ट्रॅकवर गर्दीचा ओघ सातत्याने वाढत आहे. गॉल्फ क्लब (Golf club) मैदानावर पहाटेपासूनच लोक व्यायामासाठी येत आहेत. तसेच शहरातील इतर जॉगिंग ट्रॅकदेखील पुन्हा गजबजले आहेत.

कृषीनगर, कॉलेजरोड इंदिरानगर येथे दूरवरच्या परिसरातूनदेखील लोक दरवर्षी जॉगिंग करण्यासाठी येतात.

हे जॉगिंग ट्रॅक मोठे असल्याने याठिकाणी गर्दी झाली तरीदेखील जाणवत नाही. पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलालगत असलेल्या जॉगिंग ट्रॅकवरदेखील गर्दी वाढत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या