Photo : कलेक्टर, एसपी ऑन ग्राऊंड!

Photo : कलेक्टर, एसपी ऑन ग्राऊंड!

अहमदनगर | Ahmednagar

करोनाची संचारबंदी सुरू झाल्यानंतर प्रशासन व पोलीस अधिक सक्रीय झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले व जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आहेत.

गुरूवारी त्यांंनी जिल्हाधिकारी कार्यालयातील वॉर रूमला भेट देवून सूचना दिल्या आणि बाहेर रस्त्यावर फिरणार्‍यांना शासनाचे निर्बंध ‘समजावून’ सांगीतले.

दरम्यान जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ०९७ इतके उच्चांकी करोनाबाधित आढळून आले आहे. नगर शहरासह, राहता, संगमनेर, पाथर्डी या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आढळून येत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com