Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म : जेवणाच्या पध्दतीत झाले बदल

उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म : जेवणाच्या पध्दतीत झाले बदल

माहिती – Information

सद्यस्थितीत आपली जीवनशैली बदलून गेलेली आहे. त्यातल्या त्या जेवण्याच्या पध्दती आणि वेळा यात मोठा बदल झालेला असल्यामुळे त्याचे पचनशक्तीवर गंभीर परिणाम होत आहेत.

- Advertisement -

विशेषत: टी.व्ही. बघत बघत जेवण करण्याची पध्दत चांगलीच रूढ झालेली आहे. ती चुकीची आहे, असे अनेक प्रकारे सांगितले जाते. कारण जेवत असताना टी.व्ही.वर जी दृश्ये बघतो त्यामध्ये हिंसाचार जास्त असतो आणि अशी हिंसक दृश्ये बघत जेवण केल्याने त्या जेवणाचे आपल्या मनावर होणारे परिणामही हिंसक स्वरूपाचे असतात. तेव्हा टी.व्ही. बघत जेवणार्? यांची प्रवृत्ती सात्विक नसते. म्हणून टी. व्ही. बघत जेवू नये असा सल्ला वडीलधारी मंडळी देत असतात.

पूर्वीच्या काळी जेवणाची एक पध्दत असायची. जेवणाची पंगत बसलेली असे, एकट्या दुकट्याने जेवण्याची पध्दत नव्हती. जेवणाला मोठी पंगत बसली की जेवणाचा प्रारंभ श्लोकाने केला जात असे.

‘उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म’ या श्लोकामध्ये जेवण करणे हे केवळ उदरभरण नाही तर ते यज्ञकर्म आहे असा अर्थ आहे. जेवणाच्या अधूनमधून सुध्दा श्लोक म्हटले जातात.

जेवणाऱ्यांच्या ताटासमोर (पत्रावळी) समोर रांगोळी काढलेली असते. उदबत्या लावलेल्या असतात आणि अशा सुगंधी प्रसन्न वातावरणात जेवण केले तर ते अंगी लागते, असे सांगितले जात असे.

सध्याच्या पिढीला वेगळ्या शास्त्रात सांगितल्याशिवाय कळत नाही. तेव्हा असे सांगावे लागते की टी.व्ही.समोर बसून जेवण केल्याने अन्नपचन होत नाही. टी. व्ही. वरचे कार्यक्रम रहस्यमय, भीतीदायक, भेसूर संगीतासह आणि मनाला धक्के देत सादर केलेले असतात. अशा कार्यक्रमातून तोंडाला आणि घशाला कोरड पडते. कोरड पडली की आवश्यक तेवढी लाळ तोंडात तयार होत नाही आणि लाळ कमी निर्माण झाली की अन्नपचन होत नाही. कारण पचनक्रियेमध्ये लाळ निर्माण होणे, ती चावलेल्या अन्नात मिसळणे आणि असे मिसळलेले अन्न जठराकडे जाणे महत्त्वाचे मानलेले असते.

- Advertisment -

ताज्या बातम्या