Friday, April 26, 2024
HomeUncategorizedअसा दिला वीरजवान सागरला निरोप

असा दिला वीरजवान सागरला निरोप

चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर (वय २२) यांना गोळी लागल्याने ३१ जानेवारी रोजी वीरमरण प्राप्त झाले होते. त्यांच्यावर तांबाळे येथे आज(दि २ फेब्रवारी) रोजी सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले.

सागर यांच्या भावाने त्यांच्या पार्थिवास अग्नीडाग दिला. तत्पूर्वी सागर यांचे पार्थिव संकाळी गावात दाखल झाल्यानतंर संपूर्ण गावातून विरजवान सागर अमर रहे है…च्या घोषणांनी परिसरातून दणानून गेला होता. सुरुवातीला अंतिम दर्शनासाठी पार्थिव कुंटुबाच्या ताब्यात देण्यात आले. त्यानतंर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अर्मीचे जवान व पोलिसांनी बंदुकीच्या फैर्‍या झाडुन त्यांना मानवंदना दिली. अंत्यसंस्कासासाठी आमदार मंगेश चव्हाण, खासदार उन्मेष पाटील यांच्यासह तालुक्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधीसह पंचक्रोशीत ग्रामस्थ उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या