Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedचाळीसगाव : भक्तांचे श्रध्दास्थान आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी)

चाळीसगाव : भक्तांचे श्रध्दास्थान आदिशक्ती चंडीकादेवी (पाटणादेवी)

मनोहर कांडेकर

चाळीसगाव chalisgaon प्रतिनिधी

- Advertisement -

चाळीगाव तालुक्यातील पाटणादेवी परिसर हा निसर्गरम्य असून येथे साधारण एक हजार वर्षापूर्वीचे प्राचीन देवीचे मंदिर आहे. हे मंदिर हेमाडपंथी आहे. या मंदिरालातीन गाभारे आहेत. एका गाभार्‍यात चंडीकादेवीची भव्य आणि देखणी मूर्ती आहे. दुसर्‍या गाभार्‍यात लक्ष्मी, भवानी आणि गणपतीची मूर्ती असून तिसर्‍या गाभार्‍यात विष्णूची रेखीव मूर्ती आहे.

तीन गाभारे आहेत. एका गाभार्‍यात चंडीकादेवीची भव्य आणि देखणी मूर्ती आहे. दुसर्‍या गाभार्‍यात लक्ष्मी, भवानी आणि गणपतीची मूर्ती असून तिसर्‍या गाभार्‍यात विष्णूची रेखीव मूर्ती आहे.

मुख्य देवीची मूर्ती पाहताच मन प्रसन्न होते. दरवर्षी नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात येथे साजरा होता. परंतू कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यंदा प्रथमच गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय थाटामाटात तसेच भक्तीमय वातावरणात साजरा होणारा पाटणादेवी येथील चंडिकादेवीचा नवरात्रोत्सव शासन आदेशानुसार अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत आहे.

घटस्थापनेने येथील शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला. परंतू दर वर्षांप्रमाणे भक्तांना यंदा या उत्सावात शामिल होता आले नाही. पाटणादेवी अभ्ययारण्या परिसरात वनविभागाकडून प्रवेश बंदी करण्यात आली असून गेटला मोठे पत्रे वालून बंद करण्यात आला आहे.

नवरात्रीनिमित्त चाळीसगाव तालुक्यातील पाटणादेवी येथे शारदीय नवरात्र महोत्सवाचे आयोजन केले जाते. या महोत्सवास गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे.

महोत्सव कालावधीत महापूजा, महाप्रसाद अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवरात्रोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रासह शेजारील गुजरात, मध्य प्रदेशातून देखील हजारो भाविक पाटणादेवी येथे दर्शनासाठी येतात. भाविक आणि पर्यटकांच्या गर्दीने हा परिसर फुलून जातो.

नऊ दिवस संकाळी देवीची महापूजा, सप्तशती पाठवाचन, दुपारी आरती व नैवद्य, सायंकाळची आरती, अष्टमीला चक्रपुजा, नवमीला हवन व दसर्‍याला शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता तसेच महाप्रसाद अशा विविध दैनंदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

एसटी महामंडळाकडून या काळात पाटणादेवीसाठी जादा बसेस देखील सोडल्या जातात. तर भाविकांची गैरसोय टाळणे व सुरक्षेसाठी पोलिसांकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात येतो. परंतू यंदा मात्र हा उत्सव अतिशय साधेपणाने साजरा होत आहे.

पाटणादेवी अख्यायिका

पाटणादेवीचे मंदिर उंचावर असून वर चढण्यासाठी दगडी पायर्‍या आहेत. दोन्ही बाजूंना दोन प्राचीन दीपमाळा आहेत. त्या मंदिराच्या सौंदर्यात भर टाकतात. देवी भगवतीचे भक्त देशविदेशात विखुरले असून ते वेळ मिळाल्यावर आवर्जून दर्शनास येतात.

नवरात्रात देवीची मोठी यात्रा भरते. याच पाटणादेवी परिसरात निसर्गप्रेमींना आणि पर्यटकांना भुरळ घालतील अशी अनेक ठिकाणे आहेत. हा परिसर अनेक वनौषधींनी समृद्ध आहे. जंगल भ्रमंती करणार्‍यांसाठी येथे उभा गणपती, केदारकुंड, सीतान्हाणी, पितळखोर्‍याची लेणी, जुने हेमाडपंथी महादेव मंदिर आदी ठिकाणे आहेत. हा भाग गौताळा अभयारण्य म्हणून प्रसिद्ध असून अनेक प्राणी, पशुपक्षी यांचे वास्तव्य या भागात आहे.

पर्यटकांचे आकर्षण म्हणजे येथील डोंगररांगातून खाली उडी घेणारा धबधबा. हा धबधबा धावरतीर्थ किंवा धवलतीर्थ म्हणून प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात आणि विशेषतः श्रावणात हा परिसर आणि धबधबा पाहून मन प्रसन्न होते. साधारणपणे दीडशे फुटांवरून कोसळणार्‍या या धबधब्यामुळे तेथे खाली मोठा डोह तयार झाला आहे.

पाटणादेवीचा डोंगर वर चढून गेले की, पितळखोर्‍याच्या जगप्रसिद्ध बौद्धकालीन लेण्या याच परिसरातल्या. येथील आक्रमकांनी या लेण्यांचा विनाश केला. आज त्या भग्नावस्थेत आहेत तरीही त्या गतवैभवाची साक्ष देतात. इथे प्राचीन भारतीय संस्कृती वाढली, पोसली आणि विकसित झाली. सातमाळ्यांचे डोंगर असलेल्या या प्रदेशात यादव राजांचे मांडलिक असलेले निकुंभ राजे राज्य करीत होते.

पाटणादेवीचा डोंगर वर चढून गेले की, पितळखोर्‍याच्या जगप्रसिद्ध बौद्धकालीन लेण्या याच परिसरातल्या. येथील आक्रमकांनी या लेण्यांचा विनाश केला. आज त्या भग्नावस्थेत आहेत तरीही त्या गतवैभवाची साक्ष देतात. इथे प्राचीन भारतीय संस्कृती वाढली, पोसली आणि विकसित झाली. सातमाळ्यांचे डोंगर असलेल्या या प्रदेशात यादव राजांचे मांडलिक असलेले निकुंभ राजे राज्य करीत होते.

आजही जुन्या पाटण गावात त्यांच्या काळातील वैभवशाली संस्कृतीच्या खाणाखुणा आढळतात. पाटण ही त्यांची राजधानी होती. या शहरात निरनिराळ्या पेठा असून अनेक देवीदेवतांची मंदिरे होती. व्यापार व सांस्कृतिक दृष्ट्या हा भाग त्या काळात समृद्ध होता. या गावाचे नाव पूर्वी विज्जलवीड असल्याचे सांगितले जाते. देवीच्या मंदिरामुळे पुढे कालौघात हे नाव बदलून पाटणादेवी असे झाले.

पाटणादेवी मंदिर, पितळखोरा लेणी, भास्कराचार्य आश्रम हे काळाच्या ओघात विस्मृतीत गेले होते. पाटणादेवी परिसरात स्वामी प्रणवानंद आणि मद्रासी बाबा या सारख्या साधू पुरुषांचे सुद्धा वास्तव्य राहिलेले आहे.

परिसरात विकासाची गरज

पौराणिक काळातील थोर महर्षी वाल्मिक ऋषींपासून तर भास्कराचार्य यांच्यासारख्या महान ज्योतिषी आणि गणिती यांच्या पदस्पर्शान पाटणदेवीची भूमी पावन झाली आहे. ज्यामुळे मानवाची गणितात प्रगती झाली, त्या शून्याचा शोध चाळीसगाव जवळील पाटण (आजचे पाटणादेवी) येथे भास्कराचार्यांनी लावला. ज्योतिषविषयक आणि बीजगणितावरील त्यांचा प्रसिद्ध ग्रंथ लीलावती याच परिसरात जन्माला. दरवर्षी लाखो भावीक आणि पर्यटक या स्थळाला भेट देण्यासाठी येतात. श्रवणात दरवर्षी वनराईनी नटलेल्या या परिसराचे लोभस दुष्य पाहुन अनेक जण हरपूण जातात. मागील पाच वर्षात या परिसराचा विकास करण्यासाठी प्रामीण प्रयत्न झाल्यात, परंतू तरी देखील आजही हा परिसर विकासपासून दुरच आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या