Photo Gallery : कष्ट हवे मातीला चला जपूया पशुधनाला

jalgaon-digital
1 Min Read

नाशिक | Nasik

कष्ट हवे मातीला चला जपूया पशुधनाला असे म्हणत बळीराजाने करोनाचे (Corona) सावट असूनदेखील बैलपोळा (Bailpola Festival) सण आपापल्या परीने उत्साहात साजरा केला…

बैलपोळ्याच्या पूर्वसंध्येपासूनच बैलांना सजवण्यासाठी शेतकऱ्यांनी सुरुवात केली. रंगीबेरंगी बेगडे, शिंगना चिटकून, पाठीवर झुली, गळ्यात घटी, चौराचे गोंडे यांनी बैलांना सजवून ग्रामदेवतेसमोर दर्शनासाठी बैलांना आणण्यात आले. बैलांनी सलामी दिल्यानंतर बळीराजा ‘पाऊस बरसू दे’ ‘शेत पीक जगू दे’ अशी आर्त प्रार्थना परमेश्वराकडे शेतकऱ्यांनी केली.

यंदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुष्काळाचे सावट आहे. तसेच करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचादेखील धोका वर्तविण्यात येत आहे. हे संकट दूर करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी परमेश्वराकडे प्रार्थना केली.

बैलपोळ्याचे महत्त्व

बैलपोळा सण शेतकऱ्यांसाठी अत्यंत उत्साहाचा असतो. शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात बैलांवर अवलंबून आहे. त्यामुळे बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा ग्रामीण भागासह शहरातील लोक पोळा साजरा करतात.

या दिवशी बैलाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली जाते. महिला घरामध्ये मातीच्या बैलांची पूजा करून पूजा करतात. या दिवशी गोड-धोड नैवेद्य बैलांना खाण्यासाठी ठोंबरा, पुरणपोळी, कढी, भजे यासारखे वेगवेगळे पदार्थ बनवतात.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *