Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto उन्हाळी क्रीडा शिबीरांना सुरूवात

Photo उन्हाळी क्रीडा शिबीरांना सुरूवात

जळगाव – jalgaon

खेळाडू (Players) घडविण्याचे मुख्य स्त्रोत म्हणजे (Training camp) प्रशिक्षण शिबीर. अशा शिबिरांच्या माध्यमातूनच विद्यार्थी खेळाडूंच्या (Student players) कौशल्यात भर पडते. उन्हाळ्याच्या सुटीत अशा प्रकारच्या शिबरांचे आयोजन विविध शाळा, संस्था, सामाजीक संघटना करत असते. याच अनुषंगाने शहरातील बी.यु.एन.रायसोनी मराठी प्राथ. शाळा जळगावनेही दि.१६ पासून प्रारंभ केला आहे.

- Advertisement -

या शिबिरात योगासन, कराटे, क्रिकेट, फुटबॉल, एरोबिक्स, बॅडमिंटन (Yoga, karate, cricket, football, aerobics, badminton) या क्रिडाप्रकारांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे विद्यार्थी (Playground) क्रिडांगणापासून दूर होते. त्यामुळे मुलांचा मेंटली ट्रेस जाण्याच्या व शारिरिक विकास होण्याच्या हेतूने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

संस्थेचे अध्यक्ष शिरीष रायसोनी, उमेद रायसोनी यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी अशा प्रकारचे शिबिर आयोजीत केले जाते. त्यासाठी मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील, सौ.रेखा कोळंबे व क्रीडा शिक्षक योगेश सोनवणे परिश्रम घेत आहेत.

उन्हाळी शिबीर हे खेळाडूंना एखाद्या खेळाची तोंडओळख करून देण्यासाठी फायदेशीर आहे. त्याशिवाय उन्हाळ्याच्या सुट्टीत विशेषत: शालेय मुलांकडे भरपूर रिकामा वेळ असतो. त्यामुळे आपल्या मुलाची तंदुरुस्ती वाढावी व त्याला खेळात रूची निर्माण व्हावी, या हेतूने पालक त्यांना शिबिरात दाखल करतात.

उन्हाळ्याची सुट्टी ही मनोरंजनाची मेजवानी असते. यापैकी बहुतांश मुले या सुट्टीत विविध ठिकाणच्या भटकंतींना पसंती देतात, तर काही मात्र स्वत:च्या आवडीच्या खेळात अधिक परिपूर्ण होण्यासाठी उन्हाळी क्रीडा शिबिरांमध्ये दाखल होतात. काही शाळांची उन्हाळ्याची सुट्टी नुकतीच सुरू झाली असल्याने यंदादेखील अनेक संस्था मुलांना विविध खेळांवर आधारित प्रशिक्षण देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या