Wednesday, May 8, 2024
HomeUncategorizedKnow Your Army : सारे जहाँ से अच्छा...; गोल्फ क्लबवर तोफांसह शस्त्रसाठा...

Know Your Army : सारे जहाँ से अच्छा…; गोल्फ क्लबवर तोफांसह शस्त्रसाठा दाखल; ‘पाहा’ खास Photos

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

तोफखाना केंद्राच्या वतीने नाशकातील गोल्फ क्लब मैदान येथे १८ व १९ मार्च या दोन दिवसीय शस्त्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तोफा आणि शस्त्रांचा साठा नुकताच गोल्फ क्लब मैदानावर दाखल झाला आहे. यामुळे परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे…

- Advertisement -

आज पहाटे तीन वाजता हा शस्त्रसाठा तोफखाना केंद्रातून निघून गोल्फ क्लब मैदान येथे दाखल झाला. सकाळी खासदार हेमंत गोडसे यांनी गोल्फ क्लब येथे भेट देऊन तोफांची व शस्त्रांची पाहणी केली.

उदघाटक म्हणून केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उबंदरे व खणीकर्म तथा पालकमंत्री दादा भुसे,खासदार हेमंत गोडसे उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनात बोफोर्स, आधुनिक धनूष, हलकी होवित्झर (एम-७७७), इंडियन फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम), हलकी तोफ (१०५एमएम), उखळी तोफ (१३० एम.एम), मोर्टार (१२० एम.एम), मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर (बीएम२१), लोरोस रडार सिस्टीमसह तब्बल १९ तोफा बघण्याची नाशिकरांना संधी उपलब्ध होणार आहे. यावेळी बॅन्ड पथकाचे प्रमुख कर्नल सुनीलचंद्रन यांच्या नेतृत्वाखाली बँड पथक विविध गीतगायन-वादन सादर करणार आहे.

तसेच अश्वदलाचे प्रमुख सुभेदार गौरव मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पथक घोडदौडीचे प्रात्यक्षिके करणार असून यामध्ये तुफान,शायनिंग स्टार,मॅक्स या घोड्यांसह साहिबा हि घोडी सामील होणार आहे. सुभेदार कैलास दळवी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा चमू जीम्नेक्स्टिक ची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. सकाळी ९ ते रात्री ०९:३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन नागरिकांसाठी मोफत खुले राहणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनहि लेफ्टनंट कर्नल संतोष पांडा यांनी यावेळी केले.

माजी सैनिक व विर पत्नी यांना काही अडचण असल्यास त्यांच्या तक्रार दूर करण्यासाठी या प्रदर्शनात स्टॉल लावण्यात येणार असून येथे त्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. अग्नीवर भरती प्रक्रिये संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता देखील याठिकाणी स्वतंत्र स्टॉलची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या