मनपा आयुक्तांचा दणका; गोदाघाटावर अतिक्रमण निर्मुलन मोहिम; पाहा फोटो

मनपा आयुक्तांचा दणका; गोदाघाटावर अतिक्रमण निर्मुलन मोहिम; पाहा फोटो

पंचवटी | प्रतिनिधी Panchvati

नाशिक मनपा आयुक्त रमेश पवार (NMC Commissioner Ramesh Pawar) यांच्या आदेशानुसार, आज (दि 21) पंचवटीतील गंगा घाटावरील दोन्ही किनाऱ्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.... (anti encroachment campaign in godaghat Nashik)

गोदावरीच्या किनाऱ्यावर जडीबुटी विक्रेते तसेच वेगवेगळ्या प्रकारचे साहित्य विकणाऱ्या विक्रेत्यांनी पाल मांडून आपली दुकाने थाटली होती. त्यामुळे वाहतुकीस तसेच येणाऱ्या भाविकांना अडचणीला तोंड द्यावे लागत होते. (Anti Encroachmen)

दोन दिवसापूर्वी आयुक्तांनी केलेल्या पाहणीत या सर्व भागातील अतिक्रमणाची जाणीव त्यांना झाल्यामुळे आज पंचवटी विभागीय कार्यालयाकडून अतिक्रमण मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात आली.

उपायुक्त श्रीमती डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, नाशिक पूर्व चे विभागीय अधिकारी निकम, भूषण देशमुख, राजेश सोनवणे ,प्रवीण बागुल, तसेच मनपाचे अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी यांनी गंगा घाटावरील दोन्ही किनाऱ्यावरील अतिक्रमण काढले.

यावेळी पंचवटी पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दिनेश खैरणार यांच्यासह पोलीस मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. ध्वनिक्षेपकावरून विक्रेत्यांना पाल व दुकाने काढण्यासाठी सूचना देण्यात येत होत्या.

Related Stories

No stories found.