Monday, April 29, 2024
HomeUncategorizedनिसर्ग सौंदर्य : मनुदेवी मंदिर परिसराचे विलोभनीय दृश्ये!

निसर्ग सौंदर्य : मनुदेवी मंदिर परिसराचे विलोभनीय दृश्ये!

नितीन बडगुजर

चिंचोली, ता.यावल – Yaval

- Advertisement -

यावर्षी पावसाळा सुरू होऊन दोन-अडीच महिने होत आले तरी जिल्ह्यात एकही दमदार असा पाऊस झाला नाही. मात्र तुरळक स्वरूपात रिमझिम पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील (सातपुडा निवासिनी मनुदेवी मंदिर Manudevi temple) परिसर सातपुडा पर्वत रांगा (Satpuda mountain range) सौंदर्याने बहरला आहे.

कोरोनामुळे (Corona) गेल्या दोन वर्षांपासून मंदिरे, (Tourist places) पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांची होणारी गर्दी दिसून येत नाही.

महाराष्ट्रात (Maharashtra) वैभवशाली, संपन्न सांस्कॄतिक, धार्मिक क्षेत्रात आघाडिचा जिल्हा म्हणजे जळगांव जिल्हा.

(Yaval-Ankleshwar Highway) यावल ते अंकलेश्वर महामार्गावर चोपडा ते यावल राज्य रस्त्याच्या यावल तालुक्यातील चिंचोली किंनगावच्या पश्चिम दिशेला उत्तरेस आडगाव फाटा आहे.

या आडगाव फाट्यापासून श्रीमनुदेवी तिर्थक्षेत्र अवघे 9 किलोमीटर वर आहे.

मंदिराच्या तिन्ही बाजूस उंच कडे असून मंदिराच्या समोर अंदाजे 400 फूट उंचीवरुन कोसळणारा धबधबा आहे.

वर्षातील 6 ते 7 महिने कोसळणारया या धबधब्याचे पाणी सातपुड्याच्या पायथ्याशी येते.

येथे शासनाच्या मदतीने पाझर तलाव बांधण्यात आहे. त्यामुळे मनुदेवीचा परिसर रमणीय व मनमोहक असा झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या