Photo Gallery : मुंबईत पावसाचे तांडव...

Photo Gallery : मुंबईत पावसाचे तांडव...

मुंबई | Mumbai

मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाचा हाहाकार (Heavy rains in Mumbai) पाहायला मिळत आहे. सर्व रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचले आहे. यामुळे मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाल्याचे दिसून येते...

मुंबईत गुरुवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे विविध ठकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचले आहे.

शहरात काही ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे दिसून येते. यामुळे दुकानदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.

पावसामुळे बेस्टचे मार्ग बदलण्यात आले आहे. यामुळे बेस्टने प्रवास करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहे.

कुर्ला, सायन या ठिकाणी रेल्वे रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रेल्वेची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

ठाणे शहरातील काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत तर सायनमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

तसेच वसईच्या पश्चिम पट्ट्यातील गास गाव पाण्याखाली गेले असून गावाला जोडणारा रस्ता देखील पाण्याखाली गेला आहे. पावसाच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com