Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedPhoto Gallery : पुण्यात अजित गाडगिळांनी उभारला कलेचा मोठा वारसा

Photo Gallery : पुण्यात अजित गाडगिळांनी उभारला कलेचा मोठा वारसा

‘दागिने प्रथम कला व मग व्यवसाय,’ असा विचार असणारे अजित गाडगीळ (ajit gadgil) यांनी पुण्यात खडकवासला धरणाजवळ एडीएच्या पुढे कुडजे गावात झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय स्थापन केलं आहे. (jhapurja art and culture) यामुळे पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर पडली आहे. कारण या ठिकाणी कला व संस्कृतीचा संगम पहायला मिळणार आहे. १९ मे २०२२ पासून झपूर्झा सर्वांसाठी खुले झाले आहे. …

मनुष्याच्या विविध गरजांप्रमाणे कला ही देखील गरज आहे. कलेतून नवनिर्मिती होत असते आणि त्यातून मानसिक स्वास्थ लाभत असते. त्यामुळेच लोक शाळा (Public school), वसतीगृह (Hostels), रूग्णालय बांधण्याचा (Hospital) विचार करत असतानाच मनुष्याची बौद्धिक गरज आहे, असे मानणाऱ्या अजित गाडगीळ (ajit gadgil) यांनी कलेसाठी पुढाकार घेतला ही नक्कीच वेगळी गोष्ट आहे. कारण कला ही राजाश्रय असल्याशिवाय वाढत नाही, असे म्हणतात. पण, कलेच्या या पुजाऱ्याने केवळ स्वतःसाठी तर समाजासाठी एक मोठा ठेवा निर्माण केला आहे.

- Advertisement -

भारताला कलेचा खूप मोठा वारसा लाभला आहे. त्यामुळे कलेची जोपासना करणारं, लहान वयापासूनच मुलांमध्ये कला व संस्कृतीचे संस्कार खोलवर रूजवणं व आपल्या देशाला लाभलेल्या महान कलेचा वारसा जपण्यासाठी त्यांनी उभारलेल संग्रहालयच महाराष्ट्रातील कलेचं वैयक्तिक पातळीवर स्वातंत्र्योत्तर काळात उभारलेलं एक मोठ व्यासपीठ आहे

कला व संस्कृतीचं असं मोठ व्यासपीठ मूळ उद्दिष्ट नव्हत. व्यवसायानिमित्त देशाच्या विविधा भागात अजित गाडगीळ गेल्या अनेक वर्षांपासून फिरत आहेत. त्यानिमित्त दागिने व्यवसाय करतानाच कलेची आवड त्यांना लागली.

त्यांच्या घरात कला होतीच. त्यांना आई-वडिलांकडून असेच संस्कार मिळाले होते. पण, त्यांनी कलेची एक प्रकारे मोठी पूजाच बांधली आहे. ‘मी कलेच अस व्यासपीठ उभारीन, असा विचारही कलेच्या विविध वस्तू गोळा करताना कधीच केला नव्हता,’ असे ते म्हणतात. पण त्यांनी निर्माण केलेलं हे व्यासपीठ ही येणाऱ्या पिढ्यांसाठी मोठा वारसाच आहे.

अजित गाडगील यांनी पुण्यात खडकवासला धरणाजवळ एडीए पीकॉक बेच्या पुढे कुडजे येथे कला व संस्कृतीचे व्यासपीठ झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालय स्थापन केले आहे. या ठिकाणी चित्र-हस्त-शिल्प कलेबरोबर ललित कलेसाठी व्यासपीठ, कार्यशाळा, चर्चासत्र यांच्याबरोबर प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहेत.

तसेच, येथे देशातील विविध भागांतून गाडगीळ यांनी गोळा केलेल्या पुरातन कलात्मक वस्तू, वारसा असणाऱ्या वस्तू, शिल्प येथे आहेत. तब्बल आठ एकरांत असणाऱ्या झपूर्झा कला व संस्कृती संग्रहालयात ८ कलादालने आहेत. प्रत्येक दालनाचे वैशिष्ट्य आहे.

पहिली गॅलरी – कला क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना समर्पित असून, येथे एम. एफ. हुसेन, प्रभाकर बरवे, एस. एस. बेंद्रे, राजा रवि वर्मा, रविंद्रनाथ टॅगोर, रझा, सुझा, आरा आदींची चित्रे आहेत.

दुसरी गॅलरी – दिव्याला भारतीय संस्कृतीत खूप मोठे स्थान आहे. आदिमानवापासून सुरू झालेल्या दिव्याचा प्रवास आधुनिक काळातील बॅटरीवरील दिवे, एईडी दिव्यापर्यंत पोचला आहे. येथे २० व्या शतकापासून ते आजपर्यंतचे दिवे येथे पहायला आहेत.

तिसरी गॅलरी – छपाईला सुरुवात झाल्यावर लिथोग्राफ्सचा वापर मोठ्या प्रमाणात झाला. तसाच तो भारतातही. राजा रवि वर्मा यांचा लिथोग्राफचा प्रेस पुण्याजवळ मळवली येथे होता. भारतात त्यांनी काढलेली चित्रे लिथोग्राफच्या रूपात त्या काळी उपलब्ध होती. या ठिकाणी राजा रवि वर्मा यांच्या चित्रांच्या लिथोग्राफ्सपासून, विविध कंपन्यांच्या जाहिरातींचे, चित्रपटांच्या पोस्टरचे लिथोग्राफ आहेत.

चौथी गॅलरी – प्रभाकर बरवे यांना महाराष्ट्रात मॉडर्न आर्टसाठी खूप मोठे काम केले आणि त्यांना समर्पित येथे ही गॅलरी आहे. या ठिकामी बरवे यांनी काढलेली विविध चित्रे ठेवण्यात आली आहेत.

पाचवी गॅलरी – वस्त्रांसाठी हे स्वतंत्र दालन असून, या ठिकाणी १५०-२०० वर्षांच्या पैठण्या, शैले, उपरणे, फेटे, लहान मुलांचे कपडे व त्यांची विशेषता येथे असेल. तसेच, पारंपारिक पद्धतीने वस्त्र विणण्याची पद्धत येथे दाखविण्याचा विचार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या