आकाश कंदीलाने बाजारपेठ सजू लागली

मागील वर्षी करोनामुळे दिवाळीचा सण साजरा करण्यावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, यंदा कोरोनाचा धोका खूपच कमी झाला असल्याने बाजारपेठेत नवीन उत्साह आहे. नवरात्रीच्या पूर्वीच कंदील बनवण्याचे काम सुरू झाले.

सानिया मिर्झा सोशल मीडियापासून लांब राहणार, कारण…

पर्यावरणपूरक आकाश कंदील

प्लास्टिक आणि थर्माकोलचा वापर टाळून निर्मिती केलेल्या पर्यावरणपूरक आकाशकंदिलाची खरेदी करून पुणेकर पर्यावरणाविषयीचे भान जागृत ठेवताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक आकाश कंदील मागणी वाढत आहे. थर्माकोल आणि प्लास्टिकचा वापर टाळून केलेल्या पारंपरिक आकाशकंदिलांबरोबरच हंडी स्वरूपातील आणि चांदणी आकारातील आकाशकंदील खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल आहे.

घरीच आकाश कंदीलाची निर्मिती

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शाळा बंद असल्याने मुले यंदा घरीच आहेत. त्यामुळे घरच्या घरी आकाशकंदील बनवण्यावर भर दिला जात आहे. शाळांनीही प्रकल्प म्हणून आकाशकंदील बनवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन दिले आहे. क्रेप पेपर, विविध रंग, घरात उपलब्ध असलेल्या शोभेच्या वस्तू यांचा वापर करून विविधरंगी आकाशकंदील तयार केले जात आहेत. बाजारातून आकाश कंदीलाचे साहित्य आणले जात आहे. यात रंगीत कागद, लेस आदी साहित्याची मागणी वाढली आहे.

साड्यांपासून कंदील

साड्यांपासून आकाश कंदील केले जात आहे. पैठणी, म्हैसूर सिल्क, टंचोई सिल्क, बंगळुरू सिल्क, इरकली, पॉलिकॉट आदी साड्यांपासून कंदील तयार करण्यात आले आहेत. एका साडीत चार ते पाच कंदील तयार होतात. साडीच्या किंमतीनुसार या आकाश कंदीलाची किंमत ठरत आहे.

नाशिक शहरातील बाजारपेठेतही आकाश कंदील दाखल झाले आहे. नवरात्र संपल्यानंतर विक्रेत्यांनीही दिवाळी साहित्याची दुकाने थाटली आहे.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *