Photo Gallery : फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…

0
फुले वार्‍यासवे झुलतात… डोलतात…आणि आपल्याशी बोलतात…तापलेल्या सृष्टीत…दृष्टीच्या गारव्याला… उन्हाचे पापुद्रे… अलगद सोलतात…
उन्हाळा म्हटला की डोळ्यासमोर रणरणते उन, सुकलेले गवत, आटलेले पाण्याचे प्रवाह असे सगळे डोळ्यासमोर मेते. पण याच कडक उन्हात डोळे थंडगार करण्याठी निसर्गाने काही झाडांना बहरण्याचे वरदान दिले आहे. असे वरदान लाभलेले फुलझाडांमध्ये तर अगणित…

अगदी रस्त्यावरले लॅबर्नम… त्याला बहरते जणू सोने… मणी मणी… गडद हिरवी पाने आणि पिवळी धम्मक फुले तुर्‍यातुर्‍याने येतात… नाजूक फुले वार्‍याच्या झुळकीबरोबर अलगद खाली येतात जमिनीवर पिवळा गालिचा अंथरला आहे, असे वाटते. ऋतूनुसार फळे-फुले येतात. हिवाळ्यात फुलणारी फुले मनमोहक रंगाची असतात.

पाऊस आणि हिरवी झाडे हे एक सुंदर समीकरणच, पण उन्हाळ्यातील फुले कडक उन्हाच्या मार्‍यापासून मनाला थोडा गारवा मिळावा म्हणून काहीशी सुगंधी असतात…

जास्वंदीचे सात-आठ प्रकार, गुलाब, अनंत, मोगरा, मदनबाण, जुई, सायली, रातराणी, तगर, प्राजक्त, लिली, कर्दळ अशी अनेक फुले जेव्हा वार्‍यावर डुलतात, तेव्हा होतोच नाद एका अव्यक्त संगीताचा…

LEAVE A REPLY

*