Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच नाशिक फोटोगॅलरी मुख्य बातम्या

Photo Gallery : विठ्ठलभेटीआधीच दीप्ती आणि कार्तिकीला चाहत्यांकडून अनोखी भेट

Share

विठ्ठल माऊलीचे भक्त सध्या पंढरपूरकडे आषाढी वारीसाठी निघाले आहेत. वारकर्‍यांच्या या वारीत सध्या ’झी टॉकीज’ ही मराठी चित्रपट वाहिनी खूपच सक्रिय आहे.

विठ्ठल भक्तांसाठी सोयीसुविधा पुरवणे, हरिनाम पुस्तिकांचे वाटप इत्यादी गोष्टी वाहिनीने वारकर्‍यांसाठी केल्या आहेत. दीप्ती भागवत आणि कार्तिकी गायकवाड सुद्धा आषाढीच्या वारीत सहभागी झाल्या आहेत. या दोघी ’झी टॉकीज’वरील ’गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका आहेत.

विठ्ठलभेटीसाठी निघालेल्या वारकर्‍यांसोबत जाणार्‍या या दोघींना वारीत अनेक चाहते सुद्धा भेटत आहेत. या वारीत सहभागी झालेली मंडळी ठिकठिकाणी या दोघींना थांबवून त्यांच्यासह फोटो आणि सेल्फी काढत आहेत. वारकर्‍यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीसदेखील यात मागे नाहीत.

आपले काम चोख बजावत असतांना दीप्ती आणि कार्तिकीसह फोटो काढण्याचा मोह पोलिसांना सुद्धा आवरत नाही, हे दिसून येत आहे. सामान्य भक्तांसह या दोघी वारीत सहभागी झालेल्या असल्याने, त्यांच्या सुरक्षेची विशेष खबरदारी घेण्याचा प्रयत्न सुद्धा पोलीस करत असल्याचे दिसून येत आहे.

आषाढी एकादशीला विठ्ठलभेटीचे सुख अनुभवण्याआधीच, पंढरपूरच्या वाटेवर, चाहत्यांकडून मिळत असलेले हे प्रेम अनुभवताना दोघीही भारावून गेल्या आहेत.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!