Photo Gallery : ‘देशदूत’च्या आरोग्य महोत्सवास उदंड प्रतिसाद

घोटी | प्रतिनिधी

सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त ‘देशदूत’तर्फे आयोजित महिला आरोग्य महोत्सव व बचत गटांच्या जत्रेला घोटी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शेकडो महिला आणि विद्यार्थिनींनी आपली आरोग्य तपासणी करून घेतली. तपासणीसाठी महिलांनी रांगा लावल्या होत्या. घोटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत आरोग्य महोत्सव आयोजित केला होता.

नामको हॉस्पिटलचे फिजिओथेरपीस्ट डॉ रोहन देव, कान नाक घसा तज्ञ डॉ प्राची डुबेरकर, दंत रोग तज्ञ डॉ प्रतीक्षा भागवत, नेत्ररोग तज्ञ डॉ. उन्नती कुलकर्णी, डॉ पंकज दाभाडे, डॉ आरती नवले यांनी तपासणी करून उपचार केले.

उदघाटन समारंभाला सरपंच मनोहर घोडे, माजी बांधकाम सभापती अलका जाधव, मुख्याध्यापक श्री देशमुख, देशदूतचे महाव्यवस्थापक आर के सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. देशदूतच्या वतीने श्री सोनवणे यांनी आदर्श कन्या विद्यालयाला सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन भेट दिले. प्राचार्य व विद्यार्थीनींनी त्याचा स्वीकार केला.

बचत गटांच्या जत्रेत अनेक महिला बचतगटांनी हजेरी लावली. वस्तू खरेदी व खाद्य पदार्थांच्या स्टाल्सवर महिला व विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. प्रास्ताविक व सुत्रसंचलन ‘देशदूत’च्या जळगाव आवृत्तीचे संपादक हेमंत अलोने यांनी केले. घोटी प्रतिनिधी जाकीर शेख यांनी आभार मानले. देशदूतच्या उपक्रमाचे मान्यवरांनी कौतुक केले.


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *