Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : पूरसदृश्य परिस्थिती ओसरली; रामकुंडावर घाणीचे साम्राज्य

Share

नाशिक  | प्रतिनिधी 

नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर काल (दि. ०८) गोदावरीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान, आज पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर नदीतील पाण्याची पातळीही खालावली. त्यामुळे नदीकाठच्या वाहून आलेल्या पानवेली रामकुंडपरिसर ते दहीपूलापर्यंत ठिकठिकाणी साचल्या आहेत. त्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे.

महापालिकेच्या कर्मचार्यांकडून घाण काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. पावसाची रिपरिप सुरूच असल्यामुळे याकामात काहीसा अडथळा निर्माण होताना दिसून येत आहे.

काल पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर सर्वत्र पुराचे फोटो तसेच व्हिडीओ अक्षरश: व्हायरल झाले होते. त्यानतंर आता येथील घाणीचेही फोटो व्हायरल झाल्यामुळे प्रशासनाकडून या प्रकरणाची दखल घेत घाण काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!