Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : नाशिकचे प्रसिद्ध लंडन पॅलेस जमीनदोस्त; हे आहे कारण जाणून घ्या

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक शहरातील शाही लग्नसोहळे पार पडणारे ठिकाण म्हणजे लंडन पॅलेस. तपोवन परिसरात चित्रपटात शोभेल अशी वास्तू उभारण्यात आली होती. मात्र, या वास्तूची उभारणी अनधिकृत पद्धतीने झाल्याचे महापालिकेने सांगितले. वास्तूच्या उभारणीवेळी कुठल्याही प्रकारची परवानगी महापालिकेकडून घेण्यात आलेली नव्हती. त्यामुळे आज या भव्य वास्तूला अतिक्रमण निर्मुलन विभागाने बेकायदेशीर ठरवत जमीनदोस्त केले.

पंचवटी विभागातील तपोवन परिसरात चव्हाण नगर येथे लंडन पॅलेस उभारण्यात आले होते. याठिकाणी मंगल कार्यालयाला शाही लुक देण्यात आला होता. ग्राहकाच्या इच्छेनुसार इथे लग्न सोहळे सजवले जायचे. यात मोठा खर्च ग्राहक उचलत असे. नाशिकमधील बड्या नेत्यांच्या मुलांची लग्न याठिकाणी झालेली आहेत.

महापालिकेने ही वास्तू बेकायदेशीर ठरवल्यानंतर अतिक्रमण झालेला भाग आज महापालिकेने जमीनदोस्त केला. ही कारवाई आयुक्त राधाकृष्ण गमे , अति. आयुक्त (सेवा) बोधीकरण सोनकांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.आयुक्त तथा प्रभारी उपआयुक्त (अति.) जयश्री सोनवणे यांचे सूचनेनुसार पंचवटी चे विभागीय अधिकारी आर.एस. पाटील,  एस.डी. वाडेकर, रविंद्र धारणकर, अधीक्षक महेंद्रकुमार पगारे,  हेमंत नांदुर्डीकर, अतिक्रमण विभागाचे 5 पथक व दैनंदिन अतिक्रमण निमुर्लन मोहीम राबविण्यात आली. अनुचित प्रकार टाळण्यासाठी यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!