Photo Gallery : सरकारी डॉक्टरांनी जपले सेवाव्रत ; रुग्णांकडून आशिर्वाद

0

नाशिक : माफक शुल्कात तपासणी झाली व औषधेदेखील मोफत मिळाले. त्यामुळे आज सरकारी दवाखान्यात आलेल्या अनेक रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील सेवेचे कौतुक केले. यापुढे उपचारासाठी आता सरकारी दवाखान्यात जाण्याचा निर्धार अनेकांनी व्यक्त केला.

आज अनेक नाशिककरांनी सरकारी दवाखान्यात उपचार घेतले. उपचार योग्य झाले शिवाय पैसेही कमी खर्च झाले त्यामुळे अनेक नाशिककरांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी सोनोग्राफी कक्ष, डोळे तपासणी तसेच अपघात विभागातील रुग्ण तसेच डॉक्टरांशी संवाद साधला. तेथील रुग्णांनी सरकारी डॉक्टरांना आशिर्वाद देत तुम्ही नसता तर आमच्यावर उपचार कोणी केला असता? असा भावून प्रश्न उच्चारात अनेक रुग्णांनी सरकारी दवाखान्यातील डॉक्टरांची माणुसकी बोलून दाखविली.

खासगी डॉक्टरांच्या संपामुळे सर्वच दवाखाने आणि आपत्कालीन व्यवस्था बंद झाल्या आहेत. संप काळात १०८ रुग्णवाहिका आपले चोख कर्तव्य बजावत आहे त्यामुळे खेडेगावातील अनेक रुग्णदेखील जिल्हाच्या ठिकाणी उपचार घेत आहेत.

सर्व फोटो : सतीश देवगिरे

LEAVE A REPLY

*