Photo Gallery : ‘वॉटर रन’च्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश

0

जलजागृती सप्ताहाच्या निमित्ताने जलसंपदा विभागातर्फे आयोजित ‘वॉटर रन’च्या माध्यमातून पाणी बचतीचा संदेश देण्यात आला. आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते सिंचन भवन येथे उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मुख्य अभियंता सुभाष वाघमारे, अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, निवृत्त सचिव प्रकाश भामरे, अधीक्षक अभियंता राजेश मोरे, महापालिकेचे शहर अभियंता यु.बी.पवार, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब काथेपुरी, गिरीश संघानी, प्रविण गायकवाड, सायकलींग असोसिएशनच्या मनिषा जगताप, रोटरीच्या डॉ.मनिषा रौंदळ आदी उपस्थित होते.

वॉटर रनच्या माध्यमातून जलबचतीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन श्रीमती हिरे यांनी यावेळी केले. पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा असून तो शिवारातच जिरविण्यासाठी शासनाची जलयुक्त शिवार योजना उपयुक्त ठरल्याचे त्यांनी सांगितले.

घरगुती पाणी वापरात काटकसर केल्यास शेती आणि उद्योगाला अधिक पाणी देणे शक्य होईल. त्यामुळे विकासाची गती वाढविण्यास मदत होईल, असे श्री.भामरे म्हणाले.

श्री.बगाटे यांनी जलबचतीची सुरूवात स्वत:पासून करणे महत्वाचे असल्याचे सांगून पाण्याचे प्रदूषण आणि अतिवापर रोखण्याचे आवाहन केले.

श्री.मोरे यांनी पाण्याचा पुनर्वापराबाबत जनतेत जागृती निर्माण करण्याची गरज असल्याचे सांगितले. जनजागृतीसाठी जलजागृती सप्ताह उपयुक्त ठरत असल्याचे ते म्हणाले.

जलसंपदा विभागाच्या इंजिनिअर्स जिमखाना पासून सुरू झालेल्या ‘वॉटर रन’चा एबीबी सर्कल, सीटी सेंट्रल मॉलमार्गे त्यांच ठिकाणी समारोप झाला.

जलजागृती सप्ताहांतर्गत सोमवार आणि मंगळवारी सिंचन भवन येथील सार्वजनिक वाचनालयात दुपारी 12 वाजता जलजागृती संदर्भात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*