Photo Gallery : रंगपंचमीच्या रंगात रंगणार नाशिककर

0

नाशिक : रंगपंचमीच्या रंगात आज नाशिककर रंगणार आहेत. जुन्या नाशिकमध्ये पारंपरिक रहाडांमध्ये रंग खेळला जाणार असून सकाळी विधिवत पूजा होऊन रंगोत्सवाला सुरुवात होईल.

रामकुंड परिसरातही दरवर्षीप्रमाणे रंगपंचमीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कालच नाशिककरांनी रंगपंचमीच्या तयारीसाठी रंग,  पिचकारी तसेच पाण्याचे लहान फुगे घेण्यासाठी अनेकांनी रविवार कारंजा, मेनरोड, रामकुंड परिसरातील बाजारपेठांमध्ये गर्दी केली होती.

धुलिवंदनपासून सुरू होणार्‍या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. होळी, धुलीवंदन  आणि नंतर येणारी रंगपंचमी. आयुष्य किती रंगीत आहे याची जाणीव करुन देणारा सण समजला जातो.

कडक उन्हामधे गारवा देणारे रंग, पाण्याचे फुगे लहान मुलांची तर चांगलीच चंगळ सुरु असते. हा सण त्यांचाच असतो.

काल दुपारपासूनच रामकुंड, रविवार कारंजा तसेच मेनरोड परिसरात लहानग्यांसह अनेकांनी गर्दी केली होती. वेगवेगळ्या प्रकारचे रंग खरेदी करण्यावर अनेकांनी भर दिला.

तसेच लहान मुलांसाठी वेगवेगळ्या अभिनेते तसेच अभिनेत्रींच्या फोटोंच्या पिचकार्‍या दाखल झाल्या असल्याने आकर्षक पिचकारी खरेदी करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. नागरीकांनी पाण्याचे फुगे घेतले. तर अनेकांनी कोरडे रंग घेवून रंगपंचमी पाणीविरहीत साजरी करणार असल्याचे सांगितले.

सर्व फोटो : सतीश देवगिरे, देशदूत नाशिक

LEAVE A REPLY

*