Photo Gallery : तुम्हीही अचंबित व्हाल नाशिकरांचे हे फोटो बघून…

जागतिक वन दिनानिमित्त केले होते प्रदर्शनाचे आयोजन

0
नाशिक : मंत्रालयात जागतिक वनदिनानिमित्त नाशिकच्या छायाचित्रकारांचे भव्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. प्रदर्शनातील सर्व फोटो निसर्ग छायाचित्रे होती, प्रदर्शन बघून अनेकांनी छायाचित्रकरांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी वन विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, राज्यमंत्री दिपक केसरकर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या प्रदर्शनात जंगल संस्कृतीविषयी जागरुकता निर्माण व्हावी, महाराष्ट्रातील वनांचे व वन्यजीवांची सुरक्षितता, त्यांचे वेगवेगळी आकर्षक दृश्य छायाचित्रांच्या माध्यमातुन दाखवता यावी. या  हेतुने हे प्रदर्षण भरवण्यात आले होते.
प्रदर्शनात ताड़ोबा व्याघ्र प्रकल्प, संजय गांधी नेशनल पार्क, नांदुर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, ममदापुर, कर्नाळा अभयारण्य,  दाभोसा धबधबा, बोर अभयारण्य, फ्लेमिंगो अभयारण्य, अंबोली घाट व इतर ठिकाणी जावून संग्राम गोवर्धने, प्रविण दौंड, आणि पंकज कुंभार या छायाचित्रकारांनी नयनरम्य फोटो टिपले होते.
प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांना जंगलातील प्राण्यांच्या चित्तवेधक हाकचाली, कास पथरावरील सुंदर फुले, नांदुर मधमेश्वरचे सुंदर सूर्योदय- सूर्यास्त, ताड़ोबातील संपन्न असा वन्य प्राण्यांच्या अधिवास अनुभवता आले.  प्रदर्शनाला सुमारे ४००० लोकांनी भेट दिली. या उपक्रमाचे सर्वांनीच कौतुक केले असून माहिती जाणून घेतली.
छायाचित्रांसोबतच जंगलात आढळणाऱ्या बिया, शेंगा ह्यांचे देखील प्रदर्षण मांडण्यात आले होते. तसेच सापांविषयी जनजागृती व्हावी त्यासाठी प्रथमोपचार तसेच काय काळजी घ्यावी याचे काही माहिती फलक याठिकाणी लावण्यात आले होते.

 

सर्व फोटो : प्रवीण दौंड आणि सहकारी, मुंबई

LEAVE A REPLY

*