Photo Gallery : नाशिकच्या कक्षेत एक मानबिंदू ; उडडाणपुलाला कलाकुसरीचे कोंदण

दोन महिन्यात पुर्ण पुलाखाली रेखाटली चित्रे

0

नाशिक : केवळ नाशिकच नव्हे तर पुर्ण राज्याला आदर्श ठरावे असे काम नाशिकमध्ये झाले आहे. नाशिकमध्ये मुंबई आग्रा रोडवर असलेल्याउडडाणपुलाच्या खाबांवर दोन महिन्यांहून अधिक काळ राबत चित्रकार वाल्डे आणि त्यांच्या टिमने सामाजिक संदेश देणारे चित्र रेखाटले आहेत. त्यामुळे शहराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.

उडडानपुलाखालील खांब व खालचा संपुर्ण परिसर सुशोभित करण्याचे नियोजन वास्तुरचनाकार निलेश गांधी व इंजिनियर धनंजय लोहोकरे करीत आहेत. याशिवाय पुलाखाली उद्याननिर्मिती व नैसर्गिक सुशोभिकरण ही जबाबदारी पंकज इसनागर पार पाडत आहेत.

या उडडानपुलाचे भव्य आधारस्तंभ असलेले खांबा सुशोभित करण्याचे काम दोन महिन्यांपासून सुरू होते. ते आता पुर्ण झाले आहे. या खांबांवर नाशिकचे चित्रकार व कलाशिक्षक असलेल योगेश वाल्डे व साईनाथ निकम, राजू खिल्लारे यांनी अप्रतिम चित्रे रेखाटली आहेत.

त्यात कवी कुसुमाग्रज, चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, नाशिकचे नाव उंचावणारी धावपटू कविता राउत या सोबतच वनसंवर्धन व सामाजिक संदेश, मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, रस्ता सुरक्षा या विषयावरही चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. मुंबई नाका परिसरातील खांबांवर ही चित्रे आहेत.

तर आडगाव नाका परिसरातील खांबांवर संत गाडगेबाबा यांचा स्वच्छतेचा संदेश, शिक्षण साक्षरता अभियान संदेश, व्यसनमुक्तीबाबत प्रबोधन प्राणायाम व व्याख्याम, आरोग्यावर संदेश अशा मुदयांवर चित्राव्दारे जनजागृती करण्यात आलेली आहे.

नाशिकमध्ये आलेल्या पर्यटकांसाठीही ही चित्रे आकर्षण ठरत आहेत शिवाय महामार्गावरून ये जा करणारया नागरिकांनाही पुलाखालून जातांना एक सामाजिक संदेश याव्दारे मिळत राहतो. दोन महिन्यांहून अधिक काळ ही चित्रे साकारण्यासाठी लागला आहे.

LEAVE A REPLY

*