Photo Gallery : नाशिकमध्ये पारंपरिक उत्साहात गुढीपाडवा

0

नाशिक : गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यासह देशात ठिकठिकाणी शोभायात्रा तसेच सामाजित संदेश आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आज दिवसभर रेलचेल असणार आहे.

सकाळी ८.२८ मिनिटांनी चित्ररथाच्या गुढीची पूजा जलतज्ञ डॉ.राजेंद्र सिंह जय गुरुदेव परिवाराचे आनंद वैश्यपायन संतोष कापडणे, पुरोहित महासंघाचे अध्यक्ष सतीश शुक्ला यांच्या उपस्थितीत नाशिक शहरातील साक्षी गणपती मंदिराजवळ चित्ररथाची पूजा केली.  त्यानंतर चित्ररथाद्वारे ढोलताशांच्या गजरात, बुलेट तसेच बाईकवरून स्वार होत रणरागीनिनी शोभायात्रेत सहभाग घेतला.

यावेळी शोभायात्रा मार्गावर रांगोळी काढण्यात आली होती. अनेकांनी घरांवर गुढ्या उभारून पारंपारिक पद्धतीने गुढीपाडवयाची शोभा वाढविली.

नवीन नाशिकमध्ये मराठी अभिनेता चिन्मय उद्गीरकर, किरण भालेराव, अभिनेत्री जयश्री क्षीरसागर यांच्यासह पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी तसेच महिला शोभायात्रेत सहभागी झाले होते. विशेष म्हणजे शोभायात्रेत महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली.

शोभायात्रेत स्त्री भ्रूण हत्या तसेच पाणीबचतीचा संदेश देणारे चित्ररथ सहभागी झाले होते त्यातून जनजागृती करण्यात येत होती. चित्ररथाची आकर्षक सजावट बघून अनेकांनी फोटोसेशन देखील केले.

LEAVE A REPLY

*