Photo Gallery : ‘अशोका आर्ट फेस्ट’च्या माध्यमातून कलाविष्कार

0

सातपूर : बालवयात जोपसलेल्या विविध कलागुणांद्वारे आपल्या सुप्त गुणांची जोपासना करण्यासोबतच मुलांमध्ये कलात्मकता व व्यावसायिक दृष्टी वाढवण्याच्या दृष्टीने अशोकाच्या विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांद्वारे तयार करण्यात आलेल्या हस्तकलांच्या दोन दिवसीय प्रदर्शनचा शुभारंभ आज करण्यात आला.

सिटी सेंटर मॉलच्या दुसर्‍या मजल्यावर आयोजित करण्यात आलेल्या या आर्ट फेस्टचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार आनंद सोनार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेच्या विश्वस्त आस्था कटारिया, सहसचिव श्रीकांत शुक्ल, प्राचार्या प्रिया राजवाडे, उपप्राचार्या शालू शेट्टी, रेणुका जोशी, मिनल जोशी, अपर्णा मटकरी, प्रिया डिसूझा, नेहा गंभीर, महेंद्र जगताप आदींसह मान्यवर उपस्थित होते. या कला प्रदर्शनात कॅलिग्राफी, पेंटिंग, हॉबी आयडिया, पॉट्री, स्कल्पचर, सॅण्ड आर्ट, टॅटूज आदींसह विविध प्रकारच्या कला सादर करण्यात आल्या आहेत. या आर्ट फेस्टमध्ये सुमारे 400 ते 500 विविध कलात्मक पेंटिंग्जही लावण्यात आल्या आहेत.

आर्ट फेस्टमध्ये अशोकाच्या चांदशी, वडाळा, सिन्नर, अशोका हाऊस येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या सुमारे 400 विद्यार्थ्यांद्वारे कलाकृती सादर करण्यात आल्या आहेत. या फेस्टमधून मिळणार्‍या पैशांचा विनियोग अनाथ संस्थांना मदतीच्या रूपाने केला जातो. यापूर्वी अंधशाळा, वनबंधू परिषदेचे एकल विद्यालय यांना मदत देण्यात आली आहे. नागरिकांनी या फेस्टला भेट देऊन मुलांच्या कलाकृतींची पहाणी करण्याचे आवाहन अशोका ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी विभागप्रमुख विजय देवरे, प्रवीण पाटील, केतक शेळके, सोपान थेटे, गायत्री पाटील, वैशाली पाटील आदींनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

*