Thursday, April 25, 2024
HomeजळगावPhotos # जळगावात गणेश मार्केटमध्ये अग्नितांडव ; कपड्यांची दुकाने भस्मसात

Photos # जळगावात गणेश मार्केटमध्ये अग्नितांडव ; कपड्यांची दुकाने भस्मसात

जळगाव : jalgaon

शहरातील गणेश मार्केटमधील (Ganesh Market) साड्यांसाह लेडीज कापडाच्या होलसेल पाच मजली दुकानांना (clothing stores) शॉर्ट सर्किटमुळे (short circuit) भीषण आग (Fierce fire) लागल्याची घटना शुक्रवारी रात्री 10 घडली आहे. रात्री एक ते दीड तास आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू होते. दरम्यान,या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे व्यापारींकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

शहरातील केळकर मार्केटनजीक (Kelkar Market) गणेश मार्केट असून याठिकाणी राजेश मोतीरामानी व गिरीश मोतीरामानी यांचे सारीका साडीया, सारीका टॉप, सारीका टेक्सटाईल नावाचे पाच मजली दुकान (Five storey shop) आहे. शुक्रवारी रात्री 10 वाजता या दुकानांमध्ये शॉर्टसर्किटमुळे (short circuit) आग लागली. कापडांची दुकानं असल्यामुळे बघता बघता आगीने रौद्ररुपधारण (Agnine Raudrarup) केले. त्यामुळे दुकानातील साडी तसेच ड्रेस मटेरियल जळून खाक झाले

युद्ध पातळीवर आग विझविण्याचे काम

गणेश मार्केट येथे भीषण आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या (Fire brigade) कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर आग विझविण्याचे (Extinguishing the fire) काम सुरू होते. मात्र, एवढी भीषण होती की त्यावर नियंत्रण मिळवताना अपयशच येत होते. तर आगीचे लोळ हे पाचव्या मजल्या पर्यंत जात होते. सुमारे ८ ते ९ बंबानी आगीवर नियंत्रण मिळवले.

आगीने घेतले इतर दुकानांना कचाट्यात

तब्बल एक ते दीड तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. परंतु, आगीत दुकानातील लाखो रुपयांचे सामान जळून खाक झाला होता. दुसरीकडे आगीने इतर दुकानही (shop) आपल्या कचाट्यात घेतले होते. त्यामुळे मार्केटमध्ये व्यापारी (merchant) बांधवांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. आपल्या दुकानात आज तर लागली नाही, काही साहित्य तर जळाले नाही याची शहानिशा करण्यासाठी व्यापारी बांधवांची धावपळ सुरू होती.

दुकानाबाहेरील कापड्याचे गट्ठे जळाले

मार्केटमधील व्यापाऱ्यांचा होलसेलचा व्यवसाय (Wholesale business) असल्यामुळे दुकानाच्या बाहेर मालाचे गठ्ठे ठेवले होते. या गठ्ठे देखीलजळून खाक झाली आहे. दरम्यान जे गठ्ठे जळलेले नव्हते ते व्यापाऱ्यांनी नागरिकांच्या मदतीने दुसऱ्या सुरक्षीत ठिकाणी हलविले.

पोलिसांची उशिरा घटनास्थळी धाव

शहर पोलीस ठाण्याच्या (City Police Station) मागील कंपाऊंट च्या भिंतीला लागून गणेश मार्केटची भिंत आहे. बाजूस आग लागल्याची घटना घडल्या नंतर सुमारे वीस ते पंचवीस मिनिटानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतल्याने पोलिसांचा बेजबाबदारपणा समोर आला आहे.

दहा मिनिटात घडली घटना

गणेश मार्केटमधील व्यापाऱ्यांनी रात्री 10 वाजेच्या सुमारास आपली दुकाने बंद करून ते घरी गेले. दरम्यान दहा मिनिटातच त्यांना मार्केट मध्ये आग (Fire in the market) लागल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अवघ्या दहा मिनिटात लाखो रुपयांचा माल मोतीरामानी यांच्या डोळ्यासमोर जळून खाक होत असल्याने त्यांना अश्रू अनावर झाले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या