फिलिपाइन्स : मोदींनी केले स्वतःच्या नावाच्या लॅबचे उद्घाटन!

0
फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये सोमवारी ASEAN चे उद्घाटन झाले.
यात नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्पसह अनेक दक्षिण-पूर्व एशियन देशांच्या राष्ट्राध्यक्षांचाही समावेश होता.
त्यानंतर मोदींनी मनिलाच्या इंटरनॅशनल राइस रिसर्च इन्स्टीट्यूटचा दौरा केला. येथे त्यांच्या नावावर तयार केलेल्या श्री नरेंद्र मोदी रेजिलिएंट राइस फिल्ड लॅबोरेटरीचे त्यांनी उद्घाटन केले.
आज मोदी आणि ट्रम्प यांच्यात औपचारिक भेट होणार आहे.
या भेटीमध्ये इंडो-पॅसिफिक भागातील सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. फिलिपाइन्समध्ये होत असलेल्या 31st ASEAN परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे पंतप्रधान केकियांग, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, रशियाचे पंतप्रधान दिमित्री मेद्वेदेव, मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझ्झाकही पोहोचले आहेत.
उद्घाटन सोहळ्यात रामायणाचे सादरीकरण
ASEAN च्या उद्घाटन सोहळ्यात रामायणाचे सादरीकरण झाले. याला विशेष महत्त्व असण्याचे कारण म्हणजे, एखाद्या आंतरराष्ट्रीय परिषदेत प्रथमच रामायण सादर करण्यात आले.
थाईलंड, कंबोडिया, फिलिपाइन्ससह अनेक दक्षिण-पूर्व देशांमध्ये रामायण त्यांच्या पद्धतीने सादर केले जाते.

LEAVE A REPLY

*