Friday, April 26, 2024
Homeनाशिकपीएफ सदस्य आता बदलू शकतो आधार कार्डच्या आधारे जन्मतारीख; करोनाच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओचा निर्णय

पीएफ सदस्य आता बदलू शकतो आधार कार्डच्या आधारे जन्मतारीख; करोनाच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओचा निर्णय

सातपूर | प्रतिनिधी

करोनाच्या पार्श्वभूमीवर भविष्य निर्वाह निधीच्या सदस्यांना आता आधार कार्डच्या आधारे त्यांची तीन वर्षापर्यंतची चुकीची जन्मतारीख ऑनल पद्धतीने बदलता येणार आहे. या सोबतच कामगारांना आपल्या खात्यातील ७५ टक्के रक्कम काढता येणे सोपे झाले आहे.

- Advertisement -

सर्व देशभर करोना हा साथीचा रोग पसरल्याच्या पार्श्वभूमीवर ईपीएफओ पीएफच्या सदस्यांना त्यांची जन्मतारीख सुधारण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आपल्या क्षेत्र कार्यालयांना सुधारित सूचना देण्यात आल्या आहेत.

अश्या सर्व सदस्यांसाठीजे केवायसी बंधनकारक आहे. आपल्या खात्याशी सलग्न जन्मतारीख सुधरवण्यासाठी ‘आधार’मध्ये नोंदलेली जन्मतारीख आता जन्मतारखेचा वैध पुरावा म्हणून स्वीकारला जाईल.

जर त्या दोन तारखांमधील फरक तीन वर्षपेक्षा आतील असेल तरच त्यांना या निर्णयाचा लाभ घेता येईल, आता पीएफ सदस्य सुधारणा विनंती अर्जही ऑनलाईन जमा करू शकतील.त्यामुळे सदस्यांची जन्मतारीख त्वरित प्रमाणीकृत करणे गतीने होईल.

विशेष म्हणजे यापूर्वी जन्मतारीख बदलण्यासाठी पीएफ सदस्यांना जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला अशी विविध प्रकारची कागदपत्रे सादर करावी लागत होती. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर सदस्यांना कुठल्याही प्रकारची आर्थिक अचण येऊ नये यासाठी हा तातडीचा निर्णय घेण्यात आला आहे.

पैसे काढण्यासाठी करा ऑनलाईन विनंती

देशभरातील लाँकडाऊनच्या काळात पीएफसदस्यांना आर्थिक अडचणीतून दिलासा देण्यासाठी कोविड-१९ च्या माध्यमातून पीएफ खात्यातील जमा रकमेमधून आगाऊ रक्कम कोणत्याही परताव्याविना काढता येणार आहे. यासाठी सदस्यांना ऑनलाइन अर्ज करण्याची सूचना पीएफने केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या