पीएफचा हयातीचा दाखला नोंदणीसाठी झूंबड

0
सातपूर | दि. ८ प्रतिनिधी- भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे सातत्याने पाठपूरावा करुनही काही पेन्शनधारकांनी हयातीचे दाखले संगणकीय पध्दतीने न भरल्याने त्यांचे निवृत्ती वेतन मे महिन्यापासून बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून भविष्य निर्वाह निधी कार्यालयात ज्येष्ठांच्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत.

पीएफच्या वतीनेसातत्याने आवाहन करुनही निवृत्ती वेतन धारक याबाबत उदासिनता दाखवत असल्याने ठोस पावले उचलत पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या पेन्शनधारकांना अखेरची संधी म्हणून हयातीचे दाखले संकणीकृत नोंदणी करुन घेण्याचे शेवटचे आवाहन करण्यात आले होते.

या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांपासून पीएफ कार्यालयात नागरीकांची मोठी गर्दी उसळलेली आहे. हयातीची नोंदणी करण्यासाठी तीन ते चार मशिन द्वारे काम गतीमान होण्यावर भर देण्यात आलेला आहे. दोन दिवसांत सुमारे ६०० सभासदांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली आहे. नोंदणी करण्यात येत असलेल्या पेशनर्सची संख्या फारच कमी असून अद्याप मोठठ्या प्रमाणात लोकांचे हयातीची नोंद करण्याचे काम बाकी असल्याने नागरीकांनी तातडीने या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन भविष्य निर्वाह निधी विभागाचे सहआयुक्त राहुल पवार यांनी केले आहे.

नाशिक विभागातील निवृत्ती वेतन धारकांनी आपल्या निवासाच्या जवळच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयात जाऊन डिजीटल जीवन प्रमाणपत्रांची नोंदणी तातडीने करुन घेण्याचे आवाहन करण्यात आले.

LEAVE A REPLY

*