उद्या रविवारी पेट्रोल पंप सुरू राहणार

0

नाशिक, ता. १३ : खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने १४ मे, म्हणजेच उद्यापासून प्रत्येक रविवारी पेट्रोल-डिझेल पंपांना सुटी राहिल असा निर्णय पेट्रोल डिलर्सची संघटना फामफेडाने घेतला होता.

मात्र आता यासंदर्भात त्यांना ऑईल कंपन्यांकडून १७ मे रोजी चर्चेचे निमंत्रण आल्याने तसेच या निर्णयासंदर्भातील कायदेशीर बाजू तपासून पाहूनच पेट्रोल पंपाच्या सुटीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

फामफेडा अध्यक्ष उदय लोध यांनी एका पत्रकाद्वारे हा निर्णय कळविला आहे.

या संदर्भात पुढील निर्णय होईपर्यंत पेट्रोल पंपांना रविवारी सुटी न घेण्याचा निर्णय पंपचालकांनी आज घेतला आहे.

 

LEAVE A REPLY

*